होळी सुरक्षित व्हावी म्हणून जनजागृती सुरु झाली गावोगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:45+5:302021-03-18T04:30:45+5:30

धडगाव : पारंपरिक होलिकोत्सव कोरोनामुक्त व सुरक्षित व्हावा यासाठी सातपुड्यात प्रयत्न सुरु आहेत. यांतर्गत गावोगावी कोरोना उपाययोजनांची माहिती देण्यात ...

Awareness has been spread in villages to make Holi safer | होळी सुरक्षित व्हावी म्हणून जनजागृती सुरु झाली गावोगावी

होळी सुरक्षित व्हावी म्हणून जनजागृती सुरु झाली गावोगावी

धडगाव : पारंपरिक होलिकोत्सव कोरोनामुक्त व सुरक्षित व्हावा यासाठी सातपुड्यात प्रयत्न सुरु आहेत. यांतर्गत गावोगावी कोरोना उपाययोजनांची माहिती देण्यात येत असून याला आदिवासी बांधवही प्रतिसाद देत आहेत.

दुर्गम भागात सध्या होळीच्या तयारीला गती आली आहे. उत्सावात लागणाऱ्या विविध साधनांची साफ सफाई करण्यास इतर उपक्रमांना हाती घेण्यात आले आहे. यासाठी होळीची पाळणी करणारे बावा, बुध्या यांच्या पथक प्रमुखांकडून तसेच गावच्या कारभारींकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे. बाजारपेठेत गर्दी होवू नये यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला शहरी भागात पाठवून सामानाची आवक केली जात आहे. यंदाचा उत्सव हा कोरोनामुक्तीचा उत्सव व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान धडगाव तालुक्यातील मानाच्या होळींची तयारीही सुरु झाली आहे. कोरोना उपाययोजनांसह गर्दी होणार नाही यादृष्टीने नियोजन होत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडूनही गावोगावी जनजागृती करत कोरोनाची माहिती देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यात होलिकोत्सवाचा यंदा उत्साह कायम आहे.

Web Title: Awareness has been spread in villages to make Holi safer