शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी येथे सराफा दुकानात जबरी चोरीचा प्रयत्न, चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST

शहादा तालुक्यातील वडाळी येथील बाजारपेठेत अगदी गजबजलेल्या चौकात भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास आशापुरी ज्वेलर्स या सराफ दुकानात ताईत ...

शहादा तालुक्यातील वडाळी येथील बाजारपेठेत अगदी गजबजलेल्या चौकात भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास आशापुरी ज्वेलर्स या सराफ दुकानात ताईत घेण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला व ताईत घेण्यासाठी ५०० रुपयांची नोट दुकानदाराला दिली व तीनशे रुपये परत घेतले. त्यात शंभर ची नोट ही जुन्या पद्धतीची द्यावी असा आग्रह केला. संबंधित दुकानदार मालकाचा मुलगा गौरव याने नोटा बदलण्यासाठी ड्राॅवर उघडल्यावर या संधीचा फायदा घेत गल्ल्यात पडलेले पाचशे रुपयांचे अंदाजे १०० नोटांचे बंडल काढण्याचा प्रयत्न करीत असताना दुकानमालक गौरव याचे लक्षात आले. त्याने चोरट्यांचा हात पकडला व वडिलांना बोलावले. त्यामुळे चोरटे मोटरसायकलवर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी प्रकाश सोनार व त्याचा मुलगा गौरव यांनी चोरट्यांची मोटरसायकल रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्यात ते फरफटत गेले. त्यात ते जखमी झाले. चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.

घटनेची माहिती पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे सारंगखेडा पोलिस स्टेशनला कळवले. पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट, हवालदार विजय गावित, ठाणसिंग राजपूत व गुन्हे अन्वेषण विभागाचे किरण मोरे, विजय ओगले आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला. चोरट्यांचे बूट आढळून आले असले तरी चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.

चोरट्यांची हिंमत वाढली

काही महिन्यापूर्वी सारंगखेडा येथील येथील सराफ दुकानात चोरट्यांनी धुमाकूळ घालत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर लोणखेडा, म्हसावद येथेही चोरीचा प्रयत्न केला होता. त्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या होत्या. वडाळीत दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत रात्री चैतन्य ज्वेलर या सराफ हे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला होता.