आशा सेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST2021-06-19T04:21:07+5:302021-06-19T04:21:07+5:30

शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, वडाळी येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुगड, यांना दिलेल्या निवेदनात म्हटले ...

Asha Sevika and group promoter on indefinite strike | आशा सेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर

आशा सेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर

शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, वडाळी येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुगड,

यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ७२ हजार आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत. राज्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले. सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली. त्यामध्ये आशा गटप्रवर्तक व आशा सेविका यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. परंतु शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आरोग्य सेविका पद भरतीमध्ये आशा सेविकांची व गटप्रवर्तक यांना ५० टक्के आरक्षण मिळावे, आशा सेविकांना योजना बाहेर काम देऊ नये, त्यांच्याकडून मोबदलाशिवाय काम करून घेऊ नये, प्रेरणा प्रकल्पाच्या रिपोर्टिंगसाठी दर सहामाही दीड हजार रुपये मोबदला द्यावा, दरमहा मानधन जमा करताना मोबदला हिशेब पावती प्रत्येक आशा गटप्रवर्तक यांना देण्यात यावी आदींसह इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वडाळी आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या आशा सेविका गटप्रवर्तक शीतल सोनवणे, आशा चौधरी, सुरेखा चौधरी, सोनी पाटील, वैशाली पवार, सोनी गोसावी, ज्योती मोरे, सरला बावा, चित्रा चौधरी, दुर्गा सोनवणे, दीपिका जगताप, ज्योती पाटील, कल्पना मालचे व आशा सेविका उपस्थित होत्या.

Web Title: Asha Sevika and group promoter on indefinite strike