रेमडेसिविर १२ हजाराला विक्री करणाऱ्याला शहाद्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:11+5:302021-04-17T04:30:11+5:30

यासंदर्भात वृत्त असे की, शहादा येथे रतिलाल देवराम पवार (रा. सावखेडा, ता. शहादा) हा जादा दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री ...

Arrested for selling RemediSvir for Rs 12,000 | रेमडेसिविर १२ हजाराला विक्री करणाऱ्याला शहाद्यात अटक

रेमडेसिविर १२ हजाराला विक्री करणाऱ्याला शहाद्यात अटक

यासंदर्भात वृत्त असे की, शहादा येथे रतिलाल देवराम पवार (रा. सावखेडा, ता. शहादा) हा जादा दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शहादा येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर शतायू हाॅस्पिटलजवळ सापळा लावला होता. या वेळी रतिलाल पवार हा एका मोटारसायकलवरून तेथे आला. त्या मोटारसायकलची खात्री करून पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याजवळ रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले. हे इंजेक्शन तो १२ हजार रुपयाला विक्री करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार इंजेक्शनसह मोटारसायकल, मोबाईल व त्याच्या जवळची २०० रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त करून त्यास अटक केली आहे. दरम्यान, शासकीय किमतीपेक्षा जास्त दराने रेमडेसिविर इंजेक्शनची जो कुणी विक्री करीत असेल त्याची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.

Web Title: Arrested for selling RemediSvir for Rs 12,000