गुटखा विरोधी कारवाई सुरूच, दुसऱ्या दिवशीही २५ हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:23+5:302021-03-07T04:28:23+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवैध गुटखा जप्त करण्यात आला. तिखोरा येथे १४ हजार तर मोलगी येथे ११ ...

Anti-gutka action continues, 25,000 gutkas seized on second day | गुटखा विरोधी कारवाई सुरूच, दुसऱ्या दिवशीही २५ हजारांचा गुटखा जप्त

गुटखा विरोधी कारवाई सुरूच, दुसऱ्या दिवशीही २५ हजारांचा गुटखा जप्त

नंदुरबार : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवैध गुटखा जप्त करण्यात आला. तिखोरा येथे १४ हजार तर मोलगी येथे ११ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याबाबत त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री सुरूच आहे. याबाबत पोलिसांना थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दररोज कारवाई केली जात आहे. शहादा तालुक्यातील तिखोरा येथे चौफुलीवर अमित दगा राजपूत याच्याकडे १४ हजार १९२ रुपयांचा गुटखा आढळून आला. विक्रीच्या उद्देशाने तो गुटख्याचा साठा घेऊन जात होता. याबाबत पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम सोनार यांनी फिर्याद दिल्याने अमित राजपूत याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहे.

दुसरी घटना मोलगी येथे घडली. मोलगी गावात पिंपळखुटा चौफुलीजवळ एकाला ताब्यात घेण्यात आले. खंगाराम जेरुपसराम पटेल, रा.मोलगी असे त्याचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ११ हजार ४६ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. याबाबत पोलीस कर्मचारी जितेंद्र अहिरराव यांनी फिर्याद दिल्याने मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार क्षीरसागर करीत आहे.

Web Title: Anti-gutka action continues, 25,000 gutkas seized on second day