शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात आणखी १८ जणांना कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 21:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवसात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ तळोदा येथे पाच, मोलगी ता़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवसात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ तळोदा येथे पाच, मोलगी ता़ अक्कलकुवा येथे २ तर नंदुरबार शहरात ११ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल सायंकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे़ यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १०७ झाली आहे़तळोदा शहरातील मोठा माळीवाडा भागात राहणारे ३३ आणि २९ वर्षीय पुरुष, खान्देशी गल्लीतील ५४ आणि ५१ वर्षीय पुरुष, भोई गल्लीतील ४५ वर्षीय पुरुष यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ मोलगी ता़ अक्कलकुवा येथील ४० वर्षीय पुरुष आणि सात वर्षीय बालिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे़ प्राप्त झालेल्या अहवालानुसार नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे़ यात ४१, ३१, २५ आणि ३१ वर्षीय महिला तर ३०, २७, ३०, २९, ३० आणि ३२ वर्षीय पुरुष कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ भोणे ता़ नंदुरबार येथील एका ४३ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ जिल्हा रुग्णालयात बाधा झालेल्या १० जणांपैकी सहा बाधित हे शिपाई वर्गीय पुरुष कर्मचारी तर चारही महिला ह्या स्टाफ नर्स आहेत़ बाधा झालेले सर्व पुरुष वर्गीय कर्मचारी हे जिल्हा रुग्णालय आवारातील नर्सिंग कॉलेज परिसरात क्वारंटाईन आहेत़ एकाच ठिकाणी निवासी असल्याने एकाची लागण इतरांना झाल्याचा अंदाज आहे़ दरम्यान तळोदा येथील पाच जणांना आमलाड ता़ तळोदा येथून रवाना करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे़बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६७ वर्षीय बाधित रुग्णाचा मृ्त्यू झाला आहे़ संबधित रुग्ण हा सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी आहे़ त्याचे कुटूंब आधीच क्वारंटाईन करण्यात आले आहे़ एकाच दिवशी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आणि एकाचा मृत्यू यामुळे जिल्ह्यात चिंता वाढल्या आहेत़