नंदुरबार जिल्ह्यात आणखी १८ जणांना कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 21:42 IST2020-06-24T21:42:05+5:302020-06-24T21:42:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवसात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ तळोदा येथे पाच, मोलगी ता़ ...

Another 18 people were infected with corona in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात आणखी १८ जणांना कोरोनाचा संसर्ग

नंदुरबार जिल्ह्यात आणखी १८ जणांना कोरोनाचा संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवसात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ तळोदा येथे पाच, मोलगी ता़ अक्कलकुवा येथे २ तर नंदुरबार शहरात ११ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल सायंकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे़ यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १०७ झाली आहे़
तळोदा शहरातील मोठा माळीवाडा भागात राहणारे ३३ आणि २९ वर्षीय पुरुष, खान्देशी गल्लीतील ५४ आणि ५१ वर्षीय पुरुष, भोई गल्लीतील ४५ वर्षीय पुरुष यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ मोलगी ता़ अक्कलकुवा येथील ४० वर्षीय पुरुष आणि सात वर्षीय बालिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे़ प्राप्त झालेल्या अहवालानुसार नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे़ यात ४१, ३१, २५ आणि ३१ वर्षीय महिला तर ३०, २७, ३०, २९, ३० आणि ३२ वर्षीय पुरुष कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ भोणे ता़ नंदुरबार येथील एका ४३ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ जिल्हा रुग्णालयात बाधा झालेल्या १० जणांपैकी सहा बाधित हे शिपाई वर्गीय पुरुष कर्मचारी तर चारही महिला ह्या स्टाफ नर्स आहेत़ बाधा झालेले सर्व पुरुष वर्गीय कर्मचारी हे जिल्हा रुग्णालय आवारातील नर्सिंग कॉलेज परिसरात क्वारंटाईन आहेत़ एकाच ठिकाणी निवासी असल्याने एकाची लागण इतरांना झाल्याचा अंदाज आहे़ दरम्यान तळोदा येथील पाच जणांना आमलाड ता़ तळोदा येथून रवाना करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे़
बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६७ वर्षीय बाधित रुग्णाचा मृ्त्यू झाला आहे़ संबधित रुग्ण हा सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी आहे़ त्याचे कुटूंब आधीच क्वारंटाईन करण्यात आले आहे़ एकाच दिवशी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आणि एकाचा मृत्यू यामुळे जिल्ह्यात चिंता वाढल्या आहेत़

Web Title: Another 18 people were infected with corona in Nandurbar district