शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विविध वस्तू विक्रीच्या वेळा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, त्यासाठी प्रशासनाने वेळा निश्चित केल्या आहेत.केमीस्ट, मेडीकल दुकान, किरणा व भाजीपाला, पिठाची गिरणी, पेट्रोल पंप, डिझेल पंप, एलपीजी गॅस एजन्सी, इंटरनेट सुविधा पुरविणारे, पुरवठा साखळी गोडाऊन, गोदाम, वेअर हाऊस यावर कोणतेही निर्बंध नाहीत. बेकरी, रेस्टॉरंट व हॉटेल्स सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत, दूध विक्री केंद्र सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत सुरू राहतील. अंडी, चिकन, मटन व मासे विक्रेते आठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार व रविवार असे चार दिवस प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार विक्री करतील.पशु उपचाराची औषध व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि कृषी विषयक खते व खाद्यतेलाची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. स्वस्त धान्य दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोणतेही निर्बंध नाहीत. अशा वाहनांवरील चालक व इतर कर्मचाऱ्यांनी वाहन सोडून इतरत्र फिरून गर्दी करू नये.हातगाडीवरील फळ व भाजीपाला विक्रेते गरजेनुसार गावात फिरून फळ व भाजीपाला विक्री करू शकतील. तसेच एका वेळी एकाच व्यक्तीस माल देतील. अशावेळी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जावी. दुकानदारांनी विशिष्ट अंतरावर चिन्हांकन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.