शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

अन्‌ आमदारांनी चक्क मोटारसायकलीवर केली धरणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

लोंढरे येथील धरणाला अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गळती लागून पाणी वाया जात होते. शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून दुरुस्तीचे काम काम ...

लोंढरे येथील धरणाला अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गळती लागून पाणी वाया जात होते. शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून दुरुस्तीचे काम काम व्हावे अशी मागणी करून संबंधित विभागाकडून काही महिन्यापूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र ही दुरुस्तीही योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याने जुन्या काळातला सिमेंटचा बंधारा असल्याने मागील साईटला काँक्रिट टाकून पुन्हा दुरुस्ती करावी. जेणेकरून लोंढरे, कुकावल, कहाटूळ शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केटिवेअर बंधारे दाखवण्यास टाळले

लघुसिंचन विभागाच्या माध्यमातून दुर्गम भागातील रंगूमती, सुकी नदी व नाल्यांमध्ये केटिवेअर बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यात व्यवस्थित पाणी साचते का, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. संबंधित बंधाऱ्यांची पाहणी करायची का, असे आमदारांनी विचारले असता अधिकाऱ्यांनी मात्र ते टाळले. उभादगड हद्दीतील प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली. त्या प्रकल्पाची प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाकडून एस्टिमेट तयार दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी मात्र लघुसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते.

या वेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, डॉ. कांतीलाल टाटिया, पं.स.चे माजी सदस्य विजय पाटील, भीमराव माळी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, विठोबा माळी, महात्मा ज्योतीबा युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी, बामखेडाचे मनोज चौधरी, आशाबाई भिल, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, सरपंच संगीता पवार, सनेल भिल, माजी सरपंच बापू मराठे, सुनील पाटील, वसंत चौधरी, राजेंद्र रामोळे, रवींद्र रामोळे, फेस येथील मणिलाल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी, पाटबंधारे विभाग, मध्यम प्रकल्प व लघुसिंचन विभाग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.