शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळीपूर्वी वाढीव मानधनाची थकबाकी मिळावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीपूर्वी वाढीव मानधनाची थकबाकी मिळावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केल़े दरम्यान सेविकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल़े महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे थाळीनाद आंदोलन करण्यात आल़े यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात, दिवाळीपूर्वी अंगणवाडी कर्मचा:यांना मानधन वाढीची थकबाकी रक्कम ताबडतोब देण्यात यावी, हजेरीचे दिवस विचारात मानधन अदा करण्यात यावे, 7 सप्टेंबर 2019 रोजी काढलेला शासनाचा आदेश ताबडतोब रद्द करावा, दिवाळीपूर्वी गणवेश, सादिल खर्च अदा करा, बँकेत आधार लिंक नसलेल्या कर्मचा:यांना दिवाळीपूर्वी ऑफलाईन मानधन द्यावे, मोबाईल रिपेअरींग व मोबाईल हरवल्यास रक्कम अंगणवाडी कर्मचा:यांकडून वसुली करण्याचे आदेश आयुक्त यांनी काढले आहेत ते रद्द करावेत, दिवाळीपूर्वी भाऊबीज बोनस देण्याचे आदेश काढण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ निवेदनावरील मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होत़े त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्यात येऊन स्थानिक स्तरावरील अडचणी तातडीने सोडवण्याचे सांगण्यात आल़े तर राज्यस्तरीय समस्यांबाबत शिफारस करण्याचे आश्वासन देण्यात आल़े   यावेळी संघटननेचे युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, रविंद्र ब्राrाणे, राजू पाटील, अमोल बैसाणे, लता वसावे, सबु पवार, विद्या मोरे, संध्या पाटील, इंदिरा पाडवी, वर्षा पवार, वर्षा चौधरी, मोहिनी पाटील, कमल शिंदे उपस्थित होत्या़