अनकवाडे येथे दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:10 IST2020-04-06T12:10:36+5:302020-04-06T12:10:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनकवाडे, ता.शहादा येथून सव्वादोन लाखाचा अवैध दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. याप्रकरणी ...

Ammunition seized at Ankwade | अनकवाडे येथे दारूसाठा जप्त

अनकवाडे येथे दारूसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनकवाडे, ता.शहादा येथून सव्वादोन लाखाचा अवैध दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
योगेश भगवान पवार रा.अनकवाडे, ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. म्हसावद-अनकवाडे रस्त्यावरील बिअर शॉपीच्या मागे अवैध दारूसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार, पथकाने तेथे धाड टाकली असता तेथे मध्यप्रदेश बनावटीची दारू आढळून आली. त्यात बिअर, व्हिस्की व देशीदारूसह देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट याचा समावेश आहे. पथकाने दुचाकी वाहन देखील जप्त केले आहे. एकुण २ लाख २४ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून योगेश भगवान पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अर्जून ओहोळ, अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक जे.पी.शिंदे, दुय्यम निरिक्षक एम.के.पवार, आर.एल.राजपूत, राहुल साळवे, तुषार सोनवणे, कपील ठाकुर यांच्या पथकाने केली. तपास निरिक्षक जे.पी.शिंदे करीत आहे.
लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन नाकाबंदीत व्यस्त असताना महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात मद्य तस्करांचे थैमान जारी आहे़ पोलिसांची नजर चुकवून सर्रास मध्य प्रदेशातील बनावट मद्य तालुक्यातील ग्रामीण भागात विक्री केली जात आहे़ गत आठवड्यात म्हसावद पोलिसांनी रायखेड परिसरात कारवाई केली होती़ त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकत कारवाई केली आहे़

Web Title: Ammunition seized at Ankwade