शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मिशन बिगीन अगेनमध्येही सकाळी नऊ ते पाच दरम्यान मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसोबतच जनजीवन पूर्ववत करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसोबतच जनजीवन पूर्ववत करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत़ यांतर्गत मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या टप्प्यास ३ जूनपासून सुरुवात होत आहे़ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत़ यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने व आस्थापना सुरु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे़
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करणारी दुकाने अथवा संकुले तात्काळ बंद करण्यात येतली असे सांगण्या आले आहे़ जिल्हांतर्गत बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून आंतरजिल्हा बससेवेबाबत नंतर आदेश काढण्यात येणार येणार आहेत़ आंतरराज्य बससेवादेखील पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत़ तसेच जिल्ह्यातील औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्षा सुरू राहतील, या वाहनांमध्ये केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती देण्यात आली आहे़ चारचाकी वाहनाने प्रवास करताना वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती राहणार आहेत़ विविध भागात फिरणाऱ्या दुचाकी वाहनावर केवळ चालकाला परवानगी असेल़ सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस अनुमती देण्यात आली आहे़
दरम्यानन सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरिकांनी चेहºयावर मास्कर व रुमाल वापरणे बंधनकारक राहणार आहे़ एके ठिकाणी ५ पेक्षा अधिक नागरिक जमा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे़ लग्नामध्ये ५० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी होवू शकणार नाहीत़ कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन आवश्यक राहील़ अंत्ययात्रेत २० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी असणार नाहीत़ तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे़ सार्वजनिक थुंकणे, दारु, पान, तंबाखूचे सेवन करण्यावर बंदी असणार आहे़
१ ते ३० जून मध्यरात्रीपर्यंत हे आदेश अंमलात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी कळवले आहे़ उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे़


हे सुरु ठेवण्याचे आहेत आदेश


शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासदेखील अनुमती असेल. शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक व इतर वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरीअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू राहणार आहेत़ शासकीय कार्यालयात १०० टक्के उपस्थिती राहील़ वैयक्तिक व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू ठेवण्यासही अनुमती आहे़ शहरी व ग्रामीण भागातील विविध हॉटेलमधील पार्सल सेवा सुर ठेवता येणार आहे़


हे पुढेही बंदच राहणाऱ़


शॉपींग मॉल्स, चित्रपटगृहे, प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि आॅडीटोरीअम, असेंम्ब्ली हॉल पूर्वीप्रमाणे बंद राहतील. सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आठवडे बाजार भरण्यास बंदी आहे. धार्मिक कारणासाठी एकत्र होण्यासही बंदी असेल. सलून आणि पार्लरलादेखील अनुमती असणार नाही. जिल्ह्यात रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कोणत्याही नागरिकास आवश्यक बाब वगळता इतर कारणासाठी बाहेर फिरण्यास बंदी असेल. ज्येष्ठ नागरिक, १० वषार्खालील मुले, गंभीर आजार असलेले रुग्ण आणि गर्भवती महिलांना बाहेर फिरण्यास अनुमती राहणार नाही. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठी बाहेर निघता येईल. प्रतिबंधीत क्षेत्रात केवळ मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे़