शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

तोरखेड्यात हार-कंगण बनविण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

होळी आणि गुढीपाडव्याची चाहूल लागली की साखरेच्या गाठ्यांचे रेडिमेड हार बाजारात आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण अनेक कुटुंबांमध्ये ...

होळी आणि गुढीपाडव्याची चाहूल लागली की साखरेच्या गाठ्यांचे रेडिमेड हार बाजारात आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण अनेक कुटुंबांमध्ये या गाठी निर्मितीचा व्यवसाय परंपरागतरित्या चालत आला आहे. अशा परंपरेतूनच शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील छगन भोई गेल्या महिनाभरापासून आपल्या कुटुंबाबरोबर त्या तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. या दिवसात मोठी मागणी असल्याने या कामाला महाशिवरात्रीपासूनच सुरुवात होते आणि साधारण गुढीपाडव्यापर्यंत या कामाची लगबग सुरू राहते. पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी भोई कुटुंब परिसरात प्रसिद्ध आहे. वडिलोपार्जित नव्हे तर गेल्या चार पिढ्यांचा हा उद्योग त्यांनी आजही तितक्याच समर्थपणे यशस्वी करून दाखवला आहे.

वर्षातून केवळ एक महिनाच हे काम असले तरी मोठी मागणी असल्याने ते वेळेवर पार पडणे आवश्यक असते. या साखरगाठीची रेसेपी साधारण वाटत असली तरी यामागे मोठी मेहनत घ्यावी लागते. सर्व कुटुंब या दिवसात भल्या पहाटे उठून या कामाला लागतात, असे भोई यांनी सांगितले. सुरुवातीला एका कढईला उष्णता देऊन त्यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर यात दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. मग याला चाचणी देऊन या साखरेचे पाणी एका लाकडी साच्यात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात मग यातून तयार होतो तो साखरेचा पांढरा शुभ्र हार.

ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेला हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धडपडत का होईना शाबूत असल्याने काही कुटुंबाना वर्षातून एका महिन्याचा चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र आज मोठ्या व्यवसायाच्या स्पर्धेत ही परंपरा किती शाबूत राहील, हा एक प्रश्नच आहे. अनेक वर्षांच्या या पदार्थ परंपरेमुळे होळी आणि गुढीपाडव्याला आता अशा साखर गाठींना धार्मिक महत्त्व येत आहे. दिवाळीला लाडू, करंज्या आणि संक्रांतीला तिळगूळ याप्रमाणेच होळी व गुढीपाडव्याला या साखरगाठीचे मोठे महत्त्व असते.