शहाद्यात हमाल-मापाडींना जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:31 PM2020-04-07T12:31:54+5:302020-04-07T12:32:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : लॉकडाऊन काळात मजुरी करणाऱ्या कुटुंबांचे हाल होऊ नये म्हणून शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत ...

 Allocation of essential commodities to martyrs and martyrs in martyrdom | शहाद्यात हमाल-मापाडींना जीवनावश्यक वस्तू वाटप

शहाद्यात हमाल-मापाडींना जीवनावश्यक वस्तू वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : लॉकडाऊन काळात मजुरी करणाऱ्या कुटुंबांचे हाल होऊ नये म्हणून शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाºया हमाल व मापाडींना बाजार समिती व व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, माजी नगराध्यक्ष प्रकाशचंद जैन, सुभाष मोहनलाल जैन, अजय जैन, वर्धमान जैन, मोहनलाल घेवरचंद जैन, संदीप मधुकर पाटील आदी उपस्थित होत. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे दैनंदिन काम करून उपजीविका भागवणाºया कामगार, हमाल, मापाडी यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बाजार समितीतर्फे जीवनावश्यक वस्तू असलेल्या किट वाटपाचा निर्णय दीपक पाटील यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला. या वेळी सोशल डिस्टन्सिंगची दक्षता घेण्यात आली. किट वाटपप्रसंगी बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त एक छोटेखानी कार्यक्रमात प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी भाजपाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन दीपक पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, सचिव संजय चौधरी यांनी केले.

Web Title:  Allocation of essential commodities to martyrs and martyrs in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.