शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन व्यापाऱ्यांशी दुजाभाव करत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

तळोदा येथे मागील पंधरवड्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करून सर्रासपणे दुकाने सुरू ठेवणाऱ्या विविध व्यावसायिक व व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली होती. ...

तळोदा येथे मागील पंधरवड्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करून सर्रासपणे दुकाने सुरू ठेवणाऱ्या विविध व्यावसायिक व व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. मात्र दंड आकारल्यानंतरदेखील काही व्यापाऱ्यांची दुकाने सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेत काही व्यापाऱ्यांची दुकाने सील केली.

तळोदा येथे रोज सकाळी बाजारात यात्रेचे स्वरूप दिसून येत आहे. प्रशासनाने गावातील काही दुकाने सील केली; मात्र काही दुकाने सील केली नाहीत. त्यामुळे ते व्यापारी व्यापार करीत आहेत. प्रशासनाने ही भेदभावाची वागणूक कापड व्यापाऱ्यांना देऊ नये, अशी तळोद्यातील व्यापाऱ्यांची भावना आहे. यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अजय परदेशी यांची सोमवारी सकाळी भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्यापुढे मांडली. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार गिरीश वखारे यांचीदेखील भेट घेत त्यांचे म्हणणे प्रशासनदरबारी मांडले. या शिष्टमंडळात राजेंद्र जैन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गौतम जैन, कांतिलाल जैन, खुशाल जैन, मुन्ना जैन, कांतिलाल सेठिया, लुनकरण जैन, करण जैन, कुशल पारेख आदी व्यापाऱ्यांचा समावेश होता.

गावात कोणाचा मृत्यू झाल्यास किंवा कुणाकडे लग्न, समारंभ असल्यास त्याला कापड, नवीन कपडे आवश्यक असते. परंतु शासनाने कापड दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारे कापड व इतर वस्तू घेण्यासाठी नातेवाईकांना भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. तरीदेखील वस्तू उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

शासनाने इतर दुकानदारांना दुकान उघडण्यासाठी वेळ दिली आहे, तीच वेळ कपडा व इतर व्यापाऱ्यांनादेखील द्यावी. दुकान बंद असल्यावरसुद्धा व्यापाऱ्यांना नोकरांचे व कर्मचऱ्यांचे पगार, विद्युत बिल आणि बँकेचे व्याज भरावेच लागते. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला थोडावेळ तरी दुकान उघडण्याची मुभा द्यावी. जनतेची गैरसोय टाळावी, अशी मागणी कापड व्यापारी असोशिएशनची असून, यासदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची महिती असोशिएशन अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी दिली आहे.