वेतन आयोगाचा फरकाची रक्कम देण्यात दिरंगाई-शिक्षकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:58+5:302021-03-08T04:28:58+5:30

नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्यासाठीचे लागणारे अनुदान नोव्हेंबरच्या वेतनासोबत ...

Allegation of delay in payment of difference by pay commission | वेतन आयोगाचा फरकाची रक्कम देण्यात दिरंगाई-शिक्षकांचा आरोप

वेतन आयोगाचा फरकाची रक्कम देण्यात दिरंगाई-शिक्षकांचा आरोप

नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्यासाठीचे लागणारे अनुदान नोव्हेंबरच्या वेतनासोबत आलेले आहे. जिल्ह्यातील केवळ नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत लाभ दिला गेलेला नसल्याने शिक्षक परिषदेने सातत्याने मागणी केलेली आहे. रक्कम शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा न झाल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. यापूर्वीदेखील एकस्तर वेतन श्रेणीच्या फरकासाठीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर चार महिन्यानंतर शिक्षकांना लाभ देण्यात आला होता. प्रत्येक कामात दिरंगाई करून शिक्षकांना आर्थिक वेठीस धरण्याचे काम नंदुरबार पंचायत संबंधितांकडून केले जात आहे. संबंधितांवर दप्तर दिरंगाई अंतर्गत कार्यवाहीची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने गटविकास अधिकारी पटाईत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पटाईत यांनी शिष्टमंडळास दिली. गटविकास अधीकारी यांच्या दालनात झालेल्या चर्चेप्रसंगी सहायक गट विकास अधिकारी वळवी, कक्षाधिकारी लालू पावरा, कार्यालयीन अधीक्षक चौधरी, शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव, नितेंद्र चौधरी, किरण घरटे, मनोज चौधरी,गणेश अचिंतलवार उपस्थित होते.

Web Title: Allegation of delay in payment of difference by pay commission