शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सातही वसतीगृहे झाली रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाबत दक्षता म्हणून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहरात चालवल्या जाणाऱ्या सातही वसतीगृहांना रिकामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाबत दक्षता म्हणून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहरात चालवल्या जाणाऱ्या सातही वसतीगृहांना रिकामे करण्यात आले आहे़ जवळपास दोन हजार मुले-मुली प्रशासनाने घरी रवाना केले असून तूर्तास या ठिकाणी केवळ दहावी आणि बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी मुक्कामी आहेत़नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ३२ शासकीय आणि ३० अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना यापूर्वीच घरी पाठवण्यात आले आहे़ पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना घराकडे रवाना केल्यानंतर दोन दिवसांपासून वसतीगृह रिकामी करण्याची प्रक्रिया वेग घेत होती़ बºयाच विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना समज देत प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घरी जाण्यास सांगितले होते़ यातून शहरातील चार मुलांचे आणि तीन मुलींचे असे सात वसतीगृह रिकामे करण्यात आले आहेत़ यात १ हजार ३७५ मुले आणि ६५० मुली आतापर्यंत घरी गेल्याची माहिती देण्यात आली आहे़ वसतीगृहात तूर्तास केवळ दहावी आणि बारावीचे विद्यार्थी थांबून आहेत़ या विद्यार्थ्यांची काळजी म्हणून प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी फिरत्या वैद्यकीय पथकाकडून नियमित तपासणी आणि सॅनेटायझर देऊन त्यांच्यावर उपचार करत आहेत़ नंदुरबार प्रकल्पांतर्गत येणाºया नवापुर आणि शहादा तालुक्यातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनाही घरी पाठवण्यात आल्याची माहिती सहायक प्रकल्पााधिकारी किरण मोरे यांनी दिली आहे़तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आमलाड ता़ तळोदा येथील चार वसतिगृहातील ४८४ मुले तर प्रकल्प कार्यालयाच्या आवारातील मुलींच्या दोन शासकीय वसतीगृहातील ३५७ मुली अशा एकूण ८४६ मुला-मुलींना घरी पाठवण्यात आले आहे़ अक्कलकुवा तालुक्यातील चार वसतीगृहातील २९७ मुले व ३ शासकीय वसतीगृहातील १८१ मुली तर धडगाव तालुक्यातील तीन वसतीगृहातील १६० मुले व १ मुलींच्या वसतीगृहातील ६७ मुली यांना घरी पाठवण्यात आले आहे़ दरम्यान घरी जाणाºया या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे़तळोदा प्रकल्पांतर्गत शाळेतील १६ हजार विद्यार्थ्यांना सुटी

आमलाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील मुला मुलींना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली.तळोदा तालुक्यातील आठ शासकीय आश्रमशाळा या शाळांमधील एक हजार ३०१ मुले व एक हजार ४२३ मुली असे एकूण दोन हजार ७२४ ,अक्कलकुवा तालुक्यातील १७ शासकीय आश्रमशाळा मधील तीन हजार १३० मुले व दोन हजार ९५६ मुली असे एकूण सहा हजार ९६ ,धडगाव तालुक्यातील १७ शासकीय आश्रमशाळा मधील दोन हजार ६३१ मुले व तीन हजार ३१० मुली असे एकूण पाच हजार ९४१ तर तळोदा तालुक्यातील तीन, अक्कलकुवा तालुक्यातील नऊ आणि धडगाव तालुक्यातील नऊ खाजगी अनुदानित मुला मुलींच्या २१ आश्रमशाळेतील मुला - मुलींना असे एकूण १६ शासकीय वसतिगृहातील ९४१ मुले व ६०५ मुली एकूण एक हजार एक हजार ५५९, ४१ शासकीय आश्रमशाळा मधील सात हजार ६२ मुले व सात हजार ६८९ मुली एकूण १४ हजार ७६१ मिळून सोळा हजार ३२० मुला मुलींना प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांनी रवाना केले.