शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात यंदा सर्व होळ्या पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

नंदुरबार : जिल्ह्यात यंदाही पारंपरिक होलिकोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर सातपुड्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्व मानाच्या व गावोगावच्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात यंदाही पारंपरिक होलिकोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर सातपुड्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्व मानाच्या व गावोगावच्या होळ्या पेटणार आहेत. हा उत्सव यंदा कोविड नियमांनुसार साजरा होणार असून यासाठी दुर्गम भागात जनजागृती करण्यात येणार आहे.

सातपुड्यातील होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांच्या मार्गदर्शनात जमाना ता. अक्कलकुवा येथे या संदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील मानाच्या होळ्या तसेच गावांचे कारभारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनजागृतीपर विषयांवर चर्चा करण्यात येऊन होलिकोत्सवाचे वेळापत्रक ठरवण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, काठी येथील राजवाडी होळी यंदा कोविड नियमांचे पालन करुन होणार आहे. त्यादृष्टीने तयारीला वेग देण्यात आला आहे. दुसरीकडे सातपुड्यातील इतर मानाच्या होळ्या होणार असल्याने आदिवासी बांधवांमध्ये उत्साह संचारला आहे. दुर्गम भागात यंदा होणारा होलिकोत्सव हा जनजागृतीपर असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने कोरोनापासून सर्वांनी स्वत:चा बचाव कसा करावा, मास्कचा वापर याबाबत माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे. कोरोनामुक्त असा हा उत्सव साजरा करण्यासाठी त्या-त्या गावात उपाययोजना करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या बैठकीत काय सूचना दिल्या जातात याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागून राहणार आहे.