जिल्ह्यात २१ जूनपासून कृषी संजीवनी मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:59+5:302021-06-19T04:20:59+5:30

मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयीन दिवशी शेतकऱ्यांना कृषी विद्यापिठाच्या संशोधित व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २१ ...

Agriculture revival campaign in the district from 21st June | जिल्ह्यात २१ जूनपासून कृषी संजीवनी मोहिम

जिल्ह्यात २१ जूनपासून कृषी संजीवनी मोहिम

मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयीन दिवशी शेतकऱ्यांना कृषी विद्यापिठाच्या संशोधित व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २१ जून रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रूंद वरंबा सरी पद्धती), २२ रोजी बीज प्रक्रिया, २३ रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, २४ रोजी कापूस एक गाव एक वाण, २५ रोजी विकेल ते पिकेल, २८ रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ रोजी तालुक्यातील दोन पिकात

उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० जून रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांच्या कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजनेची माहिती देण्यात येईल. १ जुलै २०२१ रोजी कृषी दिनी या मोहिमेचा समारोप कार्यक्रम होईल.

या मोहिमे दरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी सुविधा विकसित करण्यात आली आहे. मोहिमेत शेतकऱ्यांच्या यशोगाथाही दाखविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.बी. भागेश्वर यांनी केले आहे.

Web Title: Agriculture revival campaign in the district from 21st June