शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

संगणकाच्या युगात टपाल पेटी लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

तोरखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकांच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली असून, आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची ...

तोरखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकांच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली असून, आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ईमेल व मेसेजने घेतली आहे. या वेळी दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहेत.

त्यामुळे लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे.

गतिमान युगात याची जागा आता संगणकाने घेतली आहे. आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रांमधील प्रेमभाव, आदर आपल्या लेखनातून होणारी देवाण-घेवाण मोबाइल आणि संगणकाच्या कळफलकावर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची. त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत.

आज काळ बदलला आहे. प्रगती होत असताना परस्पर संवादाची साधनेही बदलली आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचे जीवन बदलले. पूर्वी प्रत्येक गावात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा. आता मात्र तो दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्रे गोळा करून पुढे पाठवत असे, आजही ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलेले नाही तिथे याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्रप्रपंच काहीसा दुरावला आहे. पूर्वी दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते.

आपत्कालीन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा, आजच्या संगणकीय युगात यात आमूलाग्र बदल झाले आहेत.

बसल्या जागी मोबाइलच्या मदतीने जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही संपूर्ण आधुनिक प्रगतीची किमया आहे.

नाही तर काही वर्षांपूर्वी ताई, माई, अक्का, पोस्टमन मामांची वाट पाहत असे. कधी कधी तर आमचं काही पत्रबित्र आलंय का, अशी विचारणादेखील करत असत. त्याकाळात नोकर भरती किंवा सुखदुःखाचे सर्व निरोप हे पत्राद्वारे मिळत असत.

त्यात लग्नपत्रिकेपासून तर नोकर भरतीच्या ऑर्डरी, न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या नोटीसी, मनिऑर्डर, सर्वच प्रकारचे निरोप पोस्टमन मामांमार्फत मिळत असत. परंतु आता व्हाॅट्‌सॲप, ई-मेल व फेसबुकद्वारे काही क्षणातच सुख-दु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकांपर्यंत पोचत असल्याने आता टपाल पेटी दिसेना अशी झाली आहे.