रामाची आरती केल्यानंतर पुन्हा बंद झाली राममंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:37 IST2020-04-03T12:37:21+5:302020-04-03T12:37:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रामनवमीनिमित्त गुरुवारी सकाळी आरतीपूजनासाठी राममंदिरे उघडी करण्यात आली़ आरतीनंतर मंदिरे बंद ...

After the Aarti of Rama, the temple was closed again | रामाची आरती केल्यानंतर पुन्हा बंद झाली राममंदिरे

रामाची आरती केल्यानंतर पुन्हा बंद झाली राममंदिरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रामनवमीनिमित्त गुरुवारी सकाळी आरतीपूजनासाठी राममंदिरे उघडी करण्यात आली़ आरतीनंतर मंदिरे बंद करण्यात येऊन पुन्हा लॉकडाऊन झाले़
सकाळी नेहरु चौकातील राममंदिरात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली़ यावेळी परदेशी समाजातर्फे राममूर्तीला अभिषेक करण्यात येऊन साध्या पद्धतीने पूजन करण्यात आले़ कोरोनाचे सावट दूर होऊन नागरिकांचे आरोग्य अबाधित राहो, अशी प्रार्थना मान्यवरांकडून करण्यात आली़ हाटदरवाजा, देसाईपुरा यासह ठिकठिकाणी असलेल्या राममंदिरांत सकाळी दर्शनासाठी भाविक उपस्थित होते़ एकमेकांपासून अंतर ठेवत रामाचे दर्शन घेण्यात आले़ सायंकाळी शहरातील काही भागात दारोदारी दिवे लावून नागरिकांनी रामनवमी साजरी केली़ तत्पूर्वी रात्री काही ठिकाणी कौटूंबिक कार्यक्रम पार पडले़

Web Title: After the Aarti of Rama, the temple was closed again