शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

२२ दिवसानंतर सुरु झाली बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले नंदुरबार बाजार समितीचे कामकाज तब्बल २२ दिवसानंतर सुरु झाले आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले नंदुरबार बाजार समितीचे कामकाज तब्बल २२ दिवसानंतर सुरु झाले आहे़ यांतर्गत सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे ८०० क्विंटल धान्य आवक झाली असून कृषी विभागाकडून यादी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना येथे धान्य विक्रीसाठी बोलावले जात आहे़लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बद असल्याने शेतीमाल काढणी करुन घरी बसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत होते़ या पार्श्वभूमीवर शासनाने तालुकास्तरावर कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून नोंदणी करुन घेत बाजार समितीत मालाची विक्री करण्याचे शेतकºयांना कळवण्यात आले होते़ या पार्श्वभूमीवर नंदुरबार बाजार समितीत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी करण्यात आलेल्या ७० शेतकºयांची नावे देण्यात आली होती़ या शेतकºयांनी गहू, ज्वारी आणि मका सोमवारी विक्रीसाठी आणले होते़ ३५ वाहनांमधून आणल्या गेलेल्या धान्याची व्यापाºयांनी सोशल डिस्टन्सिंग प्रमाणे खरेदी केली़ यावेळी बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांच्यासह सचिव योगेश अमृतकर, कार्यालय अभियंता राजेंद्र गिरासे यांनी पाहणी केली़ दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करण्यावर भर देण्यात आला होता़ शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर तातडीने ती यादी कृषी विभागाकडे देण्यात येऊन धान्य माल खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान नंदुरबार बाजार समितीत सर्वाधिक गहूची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ गव्हाला १ हजार ७०० ते १ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे़ शेतकºयांकडून कृषी विभागाकडे नोंदण्या करण्याबाबत उत्सुकता दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे़ बुधवारी आणखी ७५ शेतकºयांच्या याद्या कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे़नंदुरबार बाजार समितीचे कामकाज सोमवारी सुरु झाल्यानंतर शहादा बाजार समितीत मात्र शुकशुकाट होता़ गहूसह इतर धान्य खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजार समितीचे कामकाज बुधवारी सकाळी सुरु होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांच्याकडून देण्यात आली आहे़ कृषी विभागाकडून यादी मिळाल्यानंतर कामकाज सुरु होईल़बाजार समितीचे कामकाज सुरु झाल्यानंतर येथे काम करणाºया हमाल मापाडींना दिलासा मिळाला आहे़ तब्बल २२ दिवस रोजगार नसल्याने हमालांचे हाल सुरु आहेत़ बाजार समितीत ३०० हमाल व मापाडी काम करतात़ प्रत्येक हमालास दिवसभरातून हंगाम सुरु असताना २५० रुपयांपर्यंत रोजगार मिळतो़ परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद झाल्यापासून त्यांना रोजगार मिळाला नव्हता़ सोमवारीही सर्व ३०० लोकांऐवजी मोजक्याच जणांना येथे बोलावण्यात आले होते़ यामुळे उर्वरित हमालांच्या रोजगाराची चिंता आहे़ बुधवारी पूर्ण क्षमतेने बाजार समिती सुरु झाल्यानंतर पुढील कामाची स्थिती स्पष्ट होणार आहे़