शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने दुरसंचारचे टोचले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील  बीएसएनएलच्या अनियमित सेवेला नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी थेट टॉवरचीच होळी करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील  बीएसएनएलच्या अनियमित सेवेला नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी थेट टॉवरचीच होळी करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत अक्कलकुवा तहसिलदारांनी दूरसंचार विभागाला पत्राद्वारे नियमित सेवेसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे. शिवाय उपाययोजनेचा अहवाल देण्याचेही बजावले आहे.मोलगी परिसरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी दूरसंचारमार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली तर धडगाव तालुक्यात खुंटामोडी, सुरवाणी, कात्री, सिसा या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. तर सद्यस्थितीत शासनामार्फत करण्यात आलेली शासकीय व खाजगी ऑनलाईन कामेही वेळेवर पूर्ण होत नाही. तेथील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची ऑनलाईन कामे रखडत आहे. वारंवार खंडीत होणारी सेवा दुरुस्त व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु त्याची दुरसंचारने दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या भागातील टॉवरची होळी करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला. याबाबत दुरसंचार विभागाकडून कुठल्याही हालचाली होतांना दिसत नाही. असे असतानाच दुरसंचार विभागाला अक्कलकुवा तहसिलदारांमार्फत पत्र देण्यात आले आहे. त्यात प्रशासनांमार्फत मोलगी भागातील चारही अनियमित सेवा देणा:या टॉवरसह डाब, काठी व भगदरी येथे टॉवर उभारण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय ऑनलाईनची प्रशासकीय कामे व 108 रुग्णवाहिका या सुविधांपासूनही नागरिकांना वंचित राहावे लागत असल्याचे नमुद केले आहे. प्रशासनामार्फत पत्र देण्यात आले असतानाही दुरसंचार विभागामार्फत अपेक्षीत हालचाली सुरू झाल्या नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या  आंदोलनात मालमत्तेचे नुकसान झाले अथवा कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी दुरसंचार विभागच जबाबदार राहणार असल्याचे पत्रात तहसिलदारांमार्फत नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे दूरसंचार विभागामार्फत कुठली भूमिका घेतली जाते याकडे मोलगी भागातील बीएसएनएलच्या ग्राहकांचे लक्ष लागून आहे.