अवैध मद्यासह एकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:44 IST2020-04-08T12:44:36+5:302020-04-08T12:44:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यासह मद्य वाहून नेणाºया एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ सोमवारी ...

Action on one with illegal alcohol | अवैध मद्यासह एकावर कारवाई

अवैध मद्यासह एकावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यासह मद्य वाहून नेणाºया एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ सोमवारी सायंकाळी पोलीसांनी ही कारवाई केली़
जळका बाजार परिसरातून जाणाºया दुचाकीला पोलीसांनी अडवले असता दुचाकीस्वार खुशाल जगदीश चौधरी हा विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले़ दरम्यान पोलीसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५२० रुपये किमतीच्या देशी दारुच्या १० बाटल्या आढळून आल्या़ लॉकडाऊन असताना दारु विक्री आणि मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुशाल चौधरी याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल बिºहाडे करत आहेत़
दरम्यान सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दिनेश हरी शिरसाठ रा़ शाहुनगर हा उड्डाणपुलाजवळ संभाजी नगर चौकाजवळ संचारबंदी असताना फिरत असल्याचे पोलीस पथकाला दिसून आले़ त्याच्यावर सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस नाईक गांगुर्डे करत आहेत़

Web Title: Action on one with illegal alcohol