शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

५० जणांच्या पथकांकडून साडेतीन तास चालली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

नवापूर वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यात दुधवे गावात अवैध लाकूड तस्करी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. या कारवाईत ...

नवापूर वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यात दुधवे गावात अवैध लाकूड तस्करी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. या कारवाईत संदीप वळवी, दशरथ वसावे, रोहिदास पाडवी वीरजी वळवी (सर्व राहणार दुधवे) यांच्या घराची झडती घेतली असता साग नग ४४८, सिसम नग १० सोफा, पलंग नग असे एकूण अंदाजे ७ ते ८ घनमीटर साइज, गोल व फिनिश टिंबर माल व एक रंधा मशीन मिळून आली. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत साधारणत: ९ लाख रुपये आहे. नवापूर वन विभागाने सातत्याने अवैध लाकूड तस्करी, वाहतुकीसंदर्भात सातत्याने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर केलेली ही मोठी कारवाई दिसून येत आहे, परंतु अजूनही ग्रामीण व शहरी भागात अवैध लाकूड तस्करी करणारे मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जाते.

दुधवे गावातून चार ठिकणी अवैधरीत्या लाकूड तस्करी करून फर्निचर बनविण्याचे अवैध कारखाने सुरू होते. यात सागवानी, सिसम, शिवण या प्रजातीचे लाकूड इमारती, चौफट नग, गोल नग तयार झालेले फर्निचर, रंधा मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने वन तस्करांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत ५० वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. साधारण: पाच गाड्यांत लाकूड भरून नवापूर वन आगारात पंचनामा करून माल जमा करण्यात आला. या कारवाईत नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा, शहादा गस्ती पथकाचा समावेश होता.

नवापूर तालुक्यातील दुधवे गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध लाकूड तस्करीचा व्यवसाय चालत होता. आतापर्यंत नवापूर तालुक्यातील या गावात वन विभागाने मोठी कारवाई केली नाही. पहिल्यांदाच या गावातील चार-पाच घरांची झाडाझडती करून वनविभागाने मोठ्या प्रमाणात सागवानी, सिसम, इमारती लाकूड फर्निचर रंधा मशीन लाकूड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. दुधवे गावात जाऊन पोलीस पाटील दुधवे, सरपंच दुधवे यांची मदत घेऊन वन विभागाने कारवाई केली.

अवैध कारवाई संदर्भात या क्रमांकावर संपर्क करावा

साहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैध लाकूड वाहतूक संबंधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड

नवापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागात व शहरी भागात अवैध लाकूड तस्करीचा व्यवसाय फोफावला आहे. या ठिकाणी शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात साग, सिसम, खैर, शिवण अशा मौल्यवान प्रजातीची लाकूडतोड करून फर्निचर तयार करून इतर राज्यांत रवाना केले जात असल्याचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. नवापूर तालुका महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात असल्याने महाराष्ट्र, गुजरात राज्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने महाराष्ट्र व गुजरात वन विभागाने संयुक्त कारवाई करून वन तस्करांवर ठोस मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

नवापूर तालुक्यातील फर्निचर इतर राज्यात रवाना

नवापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड तस्करी करून फर्निचर तयार करण्याचे कारखाने उभारण्यात आलेले आहेत. सागवान, शिसम, शिवण अशा मौल्यवान प्रजातीचे फर्निचर तयार करून रात्री वाहनाने इतर राज्यात लाकूड व फर्निचर तस्करी केली जाते. या संदर्भातदेखील वन विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

वणवा पेटल्याच्या घटनांवर नियंत्रण नाही

नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागात जंगल असल्याने येथे वणवा पेटल्याच्या घटना घडत आहेत. परंतु याकडे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत असल्याने अनेक मौल्यवान लाकूड, वनसंपत्ती, वनौषधी नष्ट होत आहेत. तसेच वन्य प्राण्यांनादेखील याचा मोठा धोका आहे. त्यामुळे वणवा पेटल्याच्या घटनांवर लक्ष देऊन तत्काळ वणवा विझवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.