विनामास्क फिरणाऱ्या ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:11+5:302021-03-08T04:29:11+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसात जिल्हाभरात ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. ...

Action against more than 50 people walking around without masks | विनामास्क फिरणाऱ्या ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई

नंदुरबार : जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसात जिल्हाभरात ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, विनामास्कप्रकरणी जागेवरच २०० रुपयांच्या दंडाची तरतूद असतांना थेट गुन्हे दाखल केले जात असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने नियम व कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे नियोजन केले आहे. त्याअनुषंगाने पोलीस विभागातर्फे जिल्हाभरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दोन दिवसात ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. त्या त्या पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, विनामास्कप्रकरणी पहिल्या वेळी कारवाई झाली तर संबंधिताला २०० रुपये दंडाची शिक्षा आहे. तिसऱ्या वेळी दंड आणि गुन्हा दाखल करण्याचे प्राविधान आहे. असे असतांना थेट गुन्हे दाखल केले जात आहे. न्यायालयात गेल्यावर २०० रुपये दंड भरला जातो. परंतु यामुळे संबंधित कारवाई झालेला व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्याचाही वेळ वाया जातो. त्यामुळे आधी दंड नंतरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Action against more than 50 people walking around without masks