१८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:00 IST2020-05-17T13:00:16+5:302020-05-17T13:00:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विना मास्क फिरणाऱ्या व व्यवसाय करणाºया १८ जणांविरुद्ध जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, ...

Action against 18 persons | १८ जणांवर कारवाई

१८ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विना मास्क फिरणाऱ्या व व्यवसाय करणाºया १८ जणांविरुद्ध जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात दुपारी ४ वाजेनंतर देखील व्यवसाय सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत मास्कची सक्तीही करण्यात आली आहे. परंतु नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ जणांवर कारवाई केली आहे. नंदुरबारातील निझर रोडवरील हॉटेल रुद्र मध्ये संदीप सुरेश चौधरी यांच्याविरुद्ध, हाटदरवाजा भागातील पंकज स्वरूपदास पाडवी व विनोद कृष्णा नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
बसस्थानकाजवळ अविनाश देविदास मराठे, माळी वाड्यात विक्की गोटू ओतारी, गांधी पुतळाजवळ भानू किरणदास भोसले, जगदीश गंगाराम वळवी, प्रेमचंद शंकर राठोड यांचा समावेश आहे. नवापूर येथे पालिकेजवळ नितीन रामदास वाघ, किरण शिवदास पारधी, नरेश माधवराव खिलवाणी व दिनेश नानकराम खिलवाणी, नासीर सलीम आमलीवाला, मोहम्मद माज मेहबूब शेख, मोहम्मद जावेद सोराटीया, इसामोद्दीन शेख.
धडगाव येथील कालूसिंग वाज्या वसावे, शहादा येथील सुरेश पुखराज जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Action against 18 persons