शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा ते वैजाली चौफुली रस्त्यावर अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा येथील बसस्थानक चौफुली ते वैजाली चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधक सूचनाफलक नसल्याने वाहनधारकांना चौफुलीची ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा येथील बसस्थानक चौफुली ते वैजाली चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधक सूचनाफलक नसल्याने वाहनधारकांना चौफुलीची कल्पना येत नाही त्यामुळे या चौफुलींवर अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. या चौफुलींवर संबंधित ठेकेदारांने गांभीर्याने लक्ष देवून गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे. अन्यथा या विरोधात रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.कोळदा ते सेंधवा या रस्त्याचे काम सुरू असून, प्रकाशा येथील बसस्थानक चौफुली व वैजाली चौफुली जवळ जवळ असल्याने याठिकाणी कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नसल्याने प्रकाशेकरांचा जीव धोक्यात आला असल्याचे चित्र आहे.दरम्यान ३० फेब्रुवारी रोजी वैजाली चौफुलीवर एका जीपने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिल्याने गावातील काशिनाथ शंकर चौधरी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघात जीपदेखील रस्त्याच्या कडेला पलटी झाली होती. त्यामुळे यातील प्रवासीही जखमी झाले होते. ३ मार्च रोजीही याच चौफुलीवर एका अवजड वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जमखी झाले होते. २७ फेब्रुवारी रोजी एक ट्रक सायंकाळी रास्ताच्या कडेला उतरला होता. या वेळी थोडक्यातच हॉटेल बचावली.डांबरखेडा येथेही रस्ता काम सुरू असून, या ठिकाणीही अशीच परिस्थिती असल्याने आत्तापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर गतिरोधकाअभावी अपघात मालिकेचे सत्र सुरू झाले असून, संबंधित ठेकेदाराने या दोन्ही चौफुलीवर गतिरोधक बसून, सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.दरम्यान संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अशाच घटना घडत राहिल्या तर संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे विकासोचे अध्यक्ष हरी पाटील यांनी सांगितले.पूर्वी प्रकाशा गाव एकाच बाजूला वसले होते. मात्र आता रस्त्याचा पलीकडे ही गाव व शाळा असून, ग्रामस्थांच्या शेतीसाठी रस्त्या पलिकडील वसाहतीत जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालीत मार्गक्रमन करावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये असेही बोलले जात आहे. येत्या दोन दिवसात या मार्गावर आवश्यक त्याठिकाणी गतिरोधकाचे काम झाले नाही तर येत्या काही दिवसात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.