अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:40 IST2020-03-14T12:39:51+5:302020-03-14T12:40:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कास्ट्राईब महासंघ संलग्नीत अंगणवाडी पर्यवेक्षीका संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

In acceptance of the Anganwadi Staff Movement | अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कास्ट्राईब महासंघ संलग्नीत अंगणवाडी पर्यवेक्षीका संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
नंदुरबारात आढावा बैठक घेण्यात आली. महासंघाचे महासचिव बापू ससाणे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक परिषदेचे प्रांत सहकार्यवाह पुरोषोत्तम काळे, कास्ट्राईब महासंघ गेवराईचे कोषाध्यक्ष सुनिल बोडखे, माजी सरपंच विजय चव्हाण उपस्थित होते. येत्या महिन्याभरात राज्य पर्यवेक्षिका संघाची एक व्यापक बैठक आयोजित करून त्यात आंदोलनाची तारिख निश्चित करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे निवेदने सादर केली जातील. त्यानंतर सचिव महिला व बालविकास आणि सचिव ग्रामविकास यांचेसमवेत कास्ट्राईब महासंघाची संयुक्त बैठक लावुन या प्रश्नांची सोडवणुक करून घेण्यात येईल. यासाठी राज्यातील सर्व पर्यवेक्षिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याचेही त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चैताली आव्हाड यांनी करून पर्यवेक्षिकांच्या प्रलंबित मागण्या सभागृहासमोर मांडल्या. आंदोलनाच्या दिशेविषयी माहिती देवून सर्वांनी एकसंघ राहून ताकद दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुनंदा वाघ, हर्षना पिंगळे, वैशाली पाटील, अश्विनी करंके यांच्यासह इतर सहकारी पर्यवेक्षिकांनीही आपापली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले तर आभार पुरुषोत्तम काळे यांनी मानले.

Web Title: In acceptance of the Anganwadi Staff Movement