शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सुमारे दोन हजार आशांना मिळणार विमा सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना योद्धा म्हणून लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसेवा बजावणाºया आशा सेविकांचाही ५० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना योद्धा म्हणून लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसेवा बजावणाºया आशा सेविकांचाही ५० लाख रुपयांचा विमा उतरवण्याचे शासनाने जाहिर केले आहे़ यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने १ हजार ९०० आशा आणि गटप्रवर्तक यांच्याकडे अर्ज भरुन घेण्यास सुरुवात केली आहे़कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी आरोग्य विभाग सध्या युद्धपातळीवर काम करत आहेत़ यात जिल्हा आरोग्य विभागात काम करणारे आरोग्य कर्मचारी पुढे आहेत़ या आरोग्य सेवक आणि सेविकांच्या खांद्याला खांदा लावून ‘आशासेविका’ आणि गटप्रवर्तकही काम करत आहेत़ या आशांकडून क्वारंटाईन कक्षांसह ग्रामीण भागात आढळून येणाºया रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे सर्वेक्षण करुन त्यांना क्वारंटाईन करण्यापर्यंत सहकार्य करण्यात येत आहे़ या आशांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांच्याकडून गेल्या चार दिवसांपासून तालुकानिहाय विमा सुरक्षेचे अर्ज भरुन घेतले जात आहेत़ यासोबतच जिल्हा आरोग्य विभागात करणारे सुमारे ९०० कर्मचाºयांचेही अर्ज भरणे सुरु असून जिल्ह्यातून आशांसह किमान चार हजार आरोग्य कर्मचारी या विम्याचे अर्ज करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित असलेले कंत्राटी कर्मचाºयांचेही अर्ज भरुन घेण्यात येत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे़शासकीय कर्मचाºयांसोबत काम करणाºया आशा सेविका ह्या कोविड-१९ सोबत गर्भवती माता, सॅम-मॅम बालक तपासणीचेही काम नियमित करत आहेत़ ५० लाख रुपयांच्या विमा कवचामुळे त्यांच्या काम करण्याची उर्मी वाढणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे़

जिल्ह्यात सध्या १ हजार ८७२ आशा काम करत आहेत़ सोबत १८० गटप्रवर्तक आहेत़ या सर्वांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कोरोना प्रतिबंधात्मक कामकाजात सहभागी करुन घेण्यात आले आहे़ खासकरुन ग्रामीण भागात कोरोना जनजागृतीत या महिला सेविकांचा सहभाग मोठा आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यात आशांची मदत घेतली जात आहे़ सर्व सेविकांना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरुन देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार त्यांच्याकडून टप्प्या टप्प्याने अर्ज देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे़

आशा सेविकांसोबतच जिल्हा आरोग्य विभागात काम करणाऱ्या ८२५ कर्मचाऱ्यांचेही अर्ज भरुन घेतले जात आहेत़आशांसोबतच १४१ आरोग्य सेवक, २७८ आरोग्य सेविका, ५१ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ६३ औषध निर्माता अधिकारी, ९६ आरोग्य सहायक, ४९ आरोग्य सहाय्यिका, ६ आरोग्य पर्यवेक्षक, १ कुष्ठरोग तंत्रज्ञ अशा एकूण ८९५ आरोग्य कर्मचाºयांचा विमा उतरवण्याची कारवाईही सुरु करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून अर्ज भरुन घेतले जात आहेत़जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट अ आणि गट ब अशा १५५ अधिकाºयांकडूनही विम्याचे अर्ज भरले जाणार आहेत़वेग देण्यात आलेल्या या कामकाजामुळे आगामी काळात गरज पडल्यास एखाद्याच्या वारसांना योग्य पद्धतीने मदत देण्याची प्रक्रिया काही वेळेत पूर्ण होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे़जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर, सफाई कामगार, लिपिकवर्गीय कर्मचारी यांचेही अर्ज भरण्याचे कामकाज सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे़