बांधकाम सुरू असलेल्या घरातून 90 हजार लंपास

By Admin | Updated: May 4, 2017 13:14 IST2017-05-04T13:14:42+5:302017-05-04T13:14:42+5:30

बांधकाम सुरू असलेल्या घरातून दागिने आणि रोख रक्कम असा 90 हजार रूपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही येथे घडली़

90 thousand lamps from the house of construction | बांधकाम सुरू असलेल्या घरातून 90 हजार लंपास

बांधकाम सुरू असलेल्या घरातून 90 हजार लंपास

 नंदुरबार,दि.4- बांधकाम सुरू असलेल्या घरातून दागिने आणि रोख रक्कम असा 90 हजार रूपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही येथे घडली़  

मोठी राजमोही ता़अक्कलकुवा येथील अजीज मुसा शेख यांच्या बांधकाम सुरू असलेल्या उघडय़ा घरातील पत्री कपाटातून बिलाल समद जाद व त्याच्या तिघा साथीदारांनी रोख 50 हजार रूपये व 50 हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने 28 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लांबवल़े चोरी करून नेणारा संशयित बिलाल हा अजीज मुसा यांचा नातलग असल्याने त्यांनी त्याच्या पालकांना याबाबत माहिती देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला होता़ मात्र बिलाल हा ऐकून घेत नसल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े (वार्ताहर)

Web Title: 90 thousand lamps from the house of construction