शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २१२ मतदान केंद्रांसाठी ८०० कर्मचारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यासाठी १ लाख १३ हजार मतदार मतदान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यासाठी १ लाख १३ हजार मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांना जिल्ह्यात २१२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या केंद्रांसाठी जिल्ह्यातून एकूण ८०० कर्मचारी नियुक्त केले जावू शकतात. नंदुरबार तालुक्यातील सात, शहादा २१, तळोदा सात, धडगाव, १६, नवापूर १२ तर अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. सुमारे २०० प्रभागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत १ हजार २२९ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आता मतदान कर्मचारी नियुक्तीचा कार्यक्रमही अंतिम झाला आहे. रविवारी सर्वच तहसीलस्तरावर एक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. यातून मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राधिकारी व कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. संक्रांतीच्या दिवशी या कर्मचा-यांना तालुकास्तरावर बोलावून मशिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार ठिकठिकाणी मशिन्सची स्वच्छता करण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. दरम्यान शहादा  तालुक्यातील सर्वाधिक  २१ गावांमध्ये  मतदान होणार आहे. एकूण ७१ प्रभागात होणा-या मतदान कार्यक्रमासाठी रविवारी प्रशिक्षण घेण्यात आले. या खालाेखाल धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या ५३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सुमारे २५ हजार मतदारांना मतदान करता यावे यासाठी तालुका प्रशासनाकडून मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तळोदा तालुक्यातील २३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रियेचे नियोजन प्रशासनाने केल्याची माहिती देण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील ३५ प्रभागातील मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

कोरोना चाचण्यांची टांगती तलवार दरम्यान एकीकडे ग्रामपंचायत निवडणूकांची तयारी सुरु असली तरी दुसरीकडे कर्मचा-यांच्या कोरोना तपासण्या कराव्यात अशा सूचना राज्य शासनाच्या आहेत. परंतू जिल्ह्यात मात्र केवळ कर्मचा-यांचे थर्मल स्कॅनरद्वारे टेंपरेचर नोंद करण्यात येत आहे. यातून एखाद्या कर्मचा-यास लक्षणे असल्यास त्याच्या तपासण्या करुन घेण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी प्रशासन आरोग्य विभागाची मदत घेत असल्याची माहिती देण्यात आले आहे.  ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना तालुकास्तरावर आचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी प्रत्येकी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या पथकांकडून सातत्याने निवडणूकांमध्ये होणारा खर्च आणि प्रचारातील मुद्दे तपासले जात आहेत. पथकांकडून गावोगावी भेटीही दिल्या जात आहेत.