लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील बागवान गल्लीतील ७० वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा बुधवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ या मृत्यूमुळे खळबळ उडाली असून संबधित मयत वृद्ध हा एकटाच रहात असल्याची माहिती आहे़सोमवारी नंदुरबार शहरातील तिघांसह जिल्ह्यातील तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता़ यात बागवान गल्लीतील ७० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा समावेश होता़ वृद्धाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना मयतांची संख्या ५ झाली आहे़ जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या ३१ जणांवर उपचार सुरु आहेत़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}