शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोविड रुग्णालयांमध्ये ६७५ बेड रुग्णांविना रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खाजगी रुग्णालयात एकूण ९९४ बेड्स निर्माण करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खाजगी रुग्णालयात एकूण ९९४ बेड्स निर्माण करण्यात आले आहेत़ या बेड्सवर सध्या केवळ ३१९ रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे़ उर्वरित रुग्ण जिल्ह्याबाहेर तर बहुतांश रुग्ण हे होमआयसोलेट राहून उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
‘लोकमत’ने जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल्समधील बेडची स्थिती रविवारी पडताळून पाहिली होती़ यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या सर्वाधिक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती असून १० खाजगी कोविड कक्षांमध्ये बहुसंख्य बेड हे रिकामे असल्याचे दिसून आले आहे़ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून ४ हजार ९६९ वर पोहोचली आहे़ यात ४ हजार २९५ रूग्ण हे बरे होवून घरी गेले आहेत़ तर ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ एकूण ८६४ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे़ यातील ४२ रुग्ण हे जिल्ह्याबाहेर तर ३१९ रुग्ण हे १४ कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत़ जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने बेड रिकामे असल्याचा दावा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला आहे़ दुसरीकडे होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या चार्टमधून समोर आले आहे़
जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या ९९४ पैकी ७०० बेड हे व्हेंटीलेटर आणि आॅक्सिजन सिलींडरसह असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यामुळे जिल्ह्यात कोरोना बेड्सबाबत कोणतीही ओरड नसल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे़

नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात डिस्ट्रीक्ट कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण १४० बेडची क्षमता आहे़ यापैकी ५२ बेडवर सध्या रुग्ण असून ८८ बेड रिकामे आहेत़ सोबत शहरातील एकलव्य कोविड केअर सेंटरमध्ये २७० रुग्ण क्षमता आहे़ याठिकाणी सध्या केवळ ३९ रुग्ण उपचार घेत असून २३१ बेड रिकामे आहेत़ शहादा येथील कोविड केअर सेंटरमध्ये १२० पैकी ८८ बेड रिकामे असून ३२ बेडवर पेशंट आहेत़ नवापूर येथील कोरोना कक्षात ५० बेड असून याठिकाणी ३ रुग्ण उपचार घेत आहेत़ ४७ बेड खाली आहेत़ तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे ५० बेड क्षमता असून याठिकाणी २९ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत़ तर २१ बेड हे रिकामे असल्याची माहिती देण्यात आली आहे़ प्रशासन येत्या काही दिवसात १०० बेड वाढणार आहेत़

४९९४ बेड्स पैकी ५३० बेड्स हे शासकीय रुग्णालयातील आहेत़ उर्वरित ११ खाजगी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्याही नगण्य आहे़ जिल्ह्याबाहेर सध्या ४२ रूग्ण उपचार घेत असून ५०३ जण होम आयसोलेशन उपक्रमांतर्गत घरीच वैद्यकीय पथकांच्या देखरेखीत उपचार घेत असल्याची माहिती आहे़
४जिल्ह्यात नऊ खाजगी कोविड हॉस्पिटल्स आहेत़ यात चार नंदुरबार शहरात, तीन नवापूर तर दोन शहादा येथे आहेत़ याठिकाणी एकूण ३६४ बेड आहेत़ यापैकी २०० बेड रिकामे आहेत़
४पाचही शासकीय रुग्णालयांमध्ये ४७५ बेडवर रुग्ण नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे़ यामुळे येत्या काळात रुग्ण संख्या वाढल्यास अडचणी येणार नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे़


कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच उपचार घेण्यावर भर देत आहेत़ त्यांच्याकडून होम आयोसोलेशनचे नियम पाळले जातात़ जिल्हा आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून असते़ सद्यस्थितीत संपूर्ण रुग्णांची स्थिती तपासून त्यांच्या संमतीने दाखल केले जात आहे़
-डॉ़ के़.डी़. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबाऱ