शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या ५८ जण नवापूरच्या क्वारंटाईन कक्षात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:37 AM

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून नोंद झालेल्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील ५८ ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून नोंद झालेल्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील ५८ जणांना नवापूर येथे कोरोंटाईन करण्यात आले आहे़ यातील अती संपर्कातील तिघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. उर्वरित व्यक्तींची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरीश्चंद्र कोकणी यांनी दिली आहे़मुंबईहून नवापूर तालुक्यात आलेल्या प्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील विसरवाडी, माचाहोंडा, गडदाणी व बोरपाडा येथील एकूण ५८ व्यक्तींना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले आहे़ यापैकी तीन व्यक्तींचे स्वॅब चे नमुने घेण्यात आले आहेत. या रुग्णाने विसरवाडी येथील खाजगी दोन वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेतले होते. त्यामुळे दोन डॉक्टर व  एक परिचारिका, मसाज करणारा यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तसेच काही व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. या व्यक्तीचा विसरवाडी येथे एका सलून दुकानाशी संपर्क आल्याचे बोलले जात आहे़ मात्र अध्याप सलून दुकानदाराला क्वारंटाईन करण्यात आलेले नाही. सलून दुकानाशी या व्यक्तीचा संपर्क आलेला नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.कोरोनाबाधिताचा विसरवाडी गावाशी संपर्क आल्याची माहिती समजल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली आहे़ तसेच येथील सरपंच बकाराम गावीत यांनी गाव सहा दिवस बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे़ सोमवारी रात्रीच पूर्णपणे बॅरीकेड लावून गाव सील करण्यात आले आहे़ दरम्यान विसरवाडी येथे आरोग्य पथकाकडून घरोघरी प्रत्येक नागरिकाची आरोग्याची माहिती घेतली जात आहे. प्रशासनाने विसरवाडी व माचाहोंडा ही दोन गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेली आहेत़ या गावांचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत़ जिल्ह्यासह परजिल्ह्यातील नागरिक व ग्रामीण भागातील नागरिकांना विसरवाडी गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे यांनी दिली आहे़ बफर झोनमध्ये जुनी विसरवाडी, बालाहाट, बालअमराई, नवापाडा, कन्हाळा, कुंभारपाडा,  बोदवड या गावांचा समावेश आहे. तहसीलदार सुनिता जºहाड यांनी याबाबत आदेश काढून विविध सूचना केल्या आहेत़ गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी, सहायक पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे हे परिसरात वेळोवेळी भेटी देत आहेत़