जिल्ह्यातील ५८ आरोग्य केंद्रेही सुरक्षेच्या दृष्टीने रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:36 PM2021-01-18T12:36:43+5:302021-01-18T12:36:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९० उपकेंद्रांमध्ये फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट संदर्भात सर्वच ...

58 health centers in the district also rely on security | जिल्ह्यातील ५८ आरोग्य केंद्रेही सुरक्षेच्या दृष्टीने रामभरोसे

जिल्ह्यातील ५८ आरोग्य केंद्रेही सुरक्षेच्या दृष्टीने रामभरोसे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९० उपकेंद्रांमध्ये फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट संदर्भात सर्वच आलबेल असल्याचे चित्र आहे. काही इमारती जिर्ण झाल्या आहेत तर काही ठिकाणी नव्या इमारती असल्या तरी त्यांच्या देखभाल दुरूस्तीअभावी त्यांचीही अवस्था खराब आहे. अशा वेळी रुग्णांच्या जिवाशी खेळ होण्याचाच हा प्रकार असल्याचे चित्र आहे. 
               जिल्ह्यातील निम्मे आरोग्य केंद्रांच्या इमारतींची अवस्था वाईट आहे. त्यामुळे त्यातील इलेक्ट्रीक फिटींग आणि अग्नीरोधक यंत्रे तर नावालाच आहेत. अशा वेळी रुग्णांना जीव मुठीत घेऊनच अशा ठिकाणी उपचारासाठी थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. आरोग्य केंद्रांची देखभाल आणि दुरूस्तीबाबत देखील फारशी समाधानकारक अवस्था नाही. जुन्या इमारती असलेल्या ठिकाणी इलेक्ट्रीक फिटींगची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी वायरी लोंबकळणे, बटणांचा बॅाक्स तुटलेला असणे यासह इतर अनेक समस्या दिसून येत आहेत. त्यामुळे शॅार्ट सक्रीटचा धोकाही निर्माण होऊ शकतो. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने अशा ठिकाणांचा सर्वे करून दुरूस्तीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
         अशीच स्थिती अग्नीरोधक उपकरणांची आहे. अवघ्या  सात ते आठ आरोग्य केंद्रांमध्येच सुस्थितीतील आणि मुदत असलेले अग्नीरोधक उपकरणे आहेत. काही ठिकाणी असले तरी त्याच्या वापराबाबत कुणालाही कल्पना नाही. त्यामुळे त्यांचा असून उपयोग काय? असा प्रश्न निर्माण होतो. दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये तर वीज पुरवठ्याची समस्या असते. २० उपकेंद्रांच्या इमारती तर भाड्याच्या घरात चालतात. त्यामुळे आरोग्याची विचित्र अवस्था अशा भागात आहे. 

तालुकानिहाय आरोग्य केंद्र

नंदुरबार   ०७  शहादा  १२  नवापूर  ०९   तळोदा  ०४   अ.कुवा  १३   धडगाव   १३


जिल्ह्यातील २० उपकेंद्र चालतात भाड्याच्या घरात
जिल्ह्यातील २० उपकेंद्रांना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे ते कुडाच्या घरात किंवा साध्या घरात चालविल्या जातात. त्यात नंदुरबार तालुक्यात एक, नवापूर तालुक्यात तीन, शहादा तालुक्यात एक, अक्कलकुवा तालुक्यात नऊ तर धडगाव तालुक्यात सहा उपकेंद्रांचा समावेश आहे. अशा केंद्रांना स्वत:च्या इमारती बांधकामासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी विविध योजनेतून निधी मिळविण्यात येत आहेत. 

जिल्ह्यात ५८ आरोग्य केंद्राअंतर्गत एकुण २९० उपकेंद्र आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात ४३, नवापूर ४६, शहादा तालुक्यात ६३, अ.कुवा तालुक्यात ६१, तळोदा २७ व धडगाव तालुक्यात ५० उपकेंद्र आहेत.  


 

Web Title: 58 health centers in the district also rely on security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.