शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ४५ हजार पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या १५ वर्षापासून राज्यात माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आहे. त्यामुळे ४५ हजारांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या १५ वर्षापासून राज्यात माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आहे. त्यामुळे ४५ हजारांवर पदे रिक्त आहेत. कर्मचाºयांची अनुकंपासह तात्काळ भरती करावी अन्यथा येत्या शैक्षणिक वर्षापासून कर्मचारी कामावर हजार होणार नसल्याचा पवित्रा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या महामंडळाने घेतलेला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, १५ वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती झाली नसल्यामुळे राज्यात ४५ हजारांवर रिक्त पदे निर्माण झालेली आहेत. त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची संख्या वाढली आहे. त्यातच शिपायांची संख्याही अधिक प्रमाणात आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर शाळांमधील स्वच्छता विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. त्यातच हा कर्मचारी नसेल तर शाळेची स्वच्छता कशी होणार? शाळा प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे. प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजासाठी लिपीक नितांत गरज असताना शाळा कार्यालयांमध्ये एकही लिपीक नाही अशी परिस्थिती बºयाच शाळांमध्ये आढळून येत आहे. काही शाळांमध्ये गेल्या आठ-दहा वर्षापासून संस्था पातळीवर काही कर्मचारी काम करीत आहेत. परंतु त्यांना वैयक्तिक मान्यता नसल्याने त्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे निवेदनात नमूद आहे. याबाबत ज्या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत त्या संस्थांनी व संघटनेने शिक्षण विभागाला निवेदने व तोंडी माहिती देऊन अवगत केले आहे. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. निवेदनाची प्रत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, पुणे विभागाचे शिक्षण आयुक्त, संचालक, माध्यमिक विभाग पुणे यांना देण्यात आली आहे. राज्याध्यक्ष अनिल माने, राज्य कार्यवाह शिवाजीराव खांडेकर, राज्य कार्यवाह मोरेशवर वासेकर, नाशिक विभागीय कार्यवाह व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डी.पी. महाले, जिल्हा कार्यवाह सैयद इसरार अली, उपाध्यक्ष जुबेर, जयेश वाणी, प्रशांत पवार, माधव पटेल, महेंद्र सूर्यवंशी, मीना वसावे, योगेश निकम यांच्या निवेदनावर सह्या आहेत.शिक्षण क्षेत्रात काम करणाºया माध्यमिक शाळेतील कर्मचाºयांच्या व विद्यार्थी यांच्या प्रश्नांकडे शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केलेले आहे. कर्मचाºयांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावे. आता आश्वासन नको प्रत्यक्ष कृतीतून कारवाई व्हावी.-शिवाजीराव खांडेकर, राज्य कार्यवाह.शिक्षकेतर कर्मचाºयांनी आतापर्यंत समस्येबाबत वेळोवेळी शासन, प्रशासकीय स्तरावर निवेदने दिली आहेत. त्यानंतर फक्त आश्वासने मिळाली, समस्या मात्र ‘जैसे थे’च आहेत. शासनाने कर्मचाºयांकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. यापुढेही तसे झाल्यास नाईलाजास्तव येत्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कामावर हजर होणार नाहीत.-डी.पी. महाले, जिल्हाध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना.