शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

४३ मोटारसायकलींची लागणार विल्हेवाट; मालक आलेच नाही घ्यायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

नंदुरबार : चोरीच्या तसेच इतर विविध कारणांनी जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४३ मोटारसायकली उपनगर पोलीस ठाण्यात धूळ खात पडल्या ...

नंदुरबार : चोरीच्या तसेच इतर विविध कारणांनी जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४३ मोटारसायकली उपनगर पोलीस ठाण्यात धूळ खात पडल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित मालकांना मोटारसायकल घेऊन जाण्यास सांगूनही ते आले नसल्याने आता एप्रिल महिन्यात या दुचाकींची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

दुचाकी चोरी झाली तर संबंधित जंगजंग पछाडतो. पोलिसांकडे तपासाबाबत चकरा मारल्या जातात. परंतु जेव्हा मोटारसायकल सापडते तेव्हा विविध कागदपत्रांची पूर्तता करताना नाकी नऊ येत असल्याने दुचाकीधारक ती घेऊन जाण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यातदेखील गेल्या काही वर्षभरात दाखल विविध गुन्ह्यातील तब्बल ४३ मोटारसायकली पडून आहेत. त्यांच्या मालकांना त्या घेऊन जाण्यासाठी वेळोवेळी कळविण्यातदेखील आले आहे. परंतु संबंधित मोटारसायकल मालक त्या घेण्यासाठी आलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता त्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय उपनगर पोलिसांनी घेतला आहे.

यातील तब्बल २०१५मध्ये दाखल गुन्ह्यातील दुचाकींचादेखील समावेश आहे. त्यात अनेक महागड्या दुचाकीदेखील आहेत. जप्त केलेली वाहने न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करणे आवश्यक असते. परंतु त्यासाठी विविध कागदपत्रे आणि प्रक्रिया कराव्या लागतात. त्या करतानाच संबंधितांच्या नाकीनऊ येतात. त्यापेक्षा ती मोटारसायकल न घेतलेली बरी अशी मानसिकता होते. त्यामुळेच संबंधित अशा मोटारसायकली घेण्यास येत नसल्याचे चित्र आहे. आता अशा दुचाकींची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदवाळकर यांनी सांगितले.