शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील ३५ अंगणवाड्या नळ कनेक्शन विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

तळोदा : तालुक्यातील ३५ लहान बालकांच्या अंगणवाड्या विना नळ कनेक्शन अभावी असल्याची माहिती आढावा बैठकीतून समोर आली आहे. सध्या ...

तळोदा : तालुक्यातील ३५ लहान बालकांच्या अंगणवाड्या विना नळ कनेक्शन अभावी असल्याची माहिती आढावा बैठकीतून समोर आली आहे. सध्या कोरोना महामारीमुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी यापूर्वी तेथील बालकांसाठी मदतनीस लांबच्या हातपंपावरून पाणी आणत असे. यातील २० अंगणवाड्या अतिदुर्गम भागातील आहेत. शासनाच्या जल जीवन मिशन अभियानात तरी त्यांच्या नळ कनेक्शनचा प्रश्न मार्गी लावावा, अशी पालकांची मागणी आहे.

तीन ते सहा वयोगटातील बालकांना सकस आहार पुरविण्यासाठी तळोदा तालुक्यात साधारण २३८ अंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पामार्फत चालवल्या जात आहेत. त्यातील ३५ अंगणवाड्यांना आजही पिण्याच्या पाण्याो नळ कनेक्शन नाहीत. त्यामुळे या बालकांसाठी संबंधित अंगणवाड्यांमधील मदतनीस जवळच्या हात पंपावर जाऊन पाणी आणत असतात. न्यूबन मधील दोन, नर्मदा नगरमधील सहा, रतनपडा येथील दोन, अंमलपडा येथील दोन, सोजरबार, अलवान, ओडीबारी, वेरीमाळ, सेंदवाई पाडा, मोकासमाल, चिनिपडा, गायमुखी, केलीपणी, थेवापणी, अक्राणी, खाकरबरी, बेडवाई, टाकळी, घोडमार, रावलापाणी, हातबारी, सिलींगपूर, कुयरी दाबर, पाल्हाबारी या अंगणवाड्याचा समावेश आहे. यातील २० अंगणवाड्या या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्याचा नेहमीच प्रश्न असतो. कारण तेथील रहिवाशी लांबावर असलेल्या झऱ्यातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. साहजिकच तेथे उपाय योजना करण्यासाठी प्रशासनापुढे आव्हान असते. असे असले तरी केंद्र शासनाने जल जीवन मिशन गेल्या वर्षापासून सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत हर घर नळ कनेक्शन देण्याचे शासनाचे नियोजन आहे. सदर अभियाना अंतर्गत संबंधित अंगणवाड्यांना नळ कनेक्शन योजना राबविण्याची पालकांची मागणी आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सद्या कोरोना महामारीमुळे अंगणवाड्या शासनाने बंद केल्या असल्या तरी पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या नियमित उघडतील. त्यामुळे या कालावधीत तरी ग्रामपंचायतीने त्यांना कनेक्शन उपलब्ध करून देण्याची पालकांची अपेक्षा आहे.

बहुतेक ठिकाणी बालके जवळच्या हात पंपावर अंगणवाडीतून आहार खाल्यानंतर नजीकच्या हात पंपावर पाणी पीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेने निरागस बालकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.

नर्मदा नगर सारख्या मोठ्या ग्राम पंचायतीत कनेक्षणाच्या अभाव

तळोदा तालुक्यातील बोरद, अमोणी व नर्मदा नगर या तीन ग्रामपंचायती सर्वात मोठ्या आहेत. नर्मदा नगर येथे तब्बल सहा अंगणवाड्या आहेत. या सहाही अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बालकांना साधे नळ कनेक्शन नाही. त्यामुळे साहजिकच पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक ही वसाहत सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांची आहे. शिवाय सर्वात जुनी वसाहत आहे.

तळोदा तालुक्यातील ३५ अंगणवाड्यांमध्ये पाण्याचे नळ कनेक्शन नाही. जल जीवन मिशन योजनेतून तातडीने जोडणी करून देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे लवकरच जोडणी करून देणार आहेत. - भाऊसाहेब बोरकर, बाल विकास अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय, तळोदा.