शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३१९ शाळा खोल्या पडक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

जिल्ह्यातील अनेक भागांतील शाळा खोल्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्वाधिक शाळा खोल्यांची दुरावस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागांत आहेत. या ...

जिल्ह्यातील अनेक भागांतील शाळा खोल्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. सर्वाधिक शाळा खोल्यांची दुरावस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागांत आहेत. या शाळा खोल्या बांधकामासाठी विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात यातील निम्म्यांपेक्षा अधिक शाळा खोल्या बांधून मिळतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात तीन हजार ५६३ शाळा खोल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत तर २१८ खोल्या या मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. अर्थात मोफत खोल्या या त्या-त्या गावातील ग्रामपंचायतींनी सभागृहे व खासगी घरे या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत. मोफत उपलब्ध इमारतींमध्ये शहादा तालुक्यात चार ठिकाणी, तळोदा तालुक्यात २० ठिकाणी, अक्कलकुवा तालुक्यात ५९ ठिकाणी तर धडगाव तालुक्यात १३५ ठिकाणी मोफत शाळा खोल्या आहेत. ठिकाणी भाड्याच्या खोल्या आहेत. तळोदा तालुक्यात त्या आहेत. उघड्यावर एकही शाळा भरत नाही. तालुकानिहाय जिल्हा परिषद शाळा खोल्यांची उपलब्धता पुढीलप्रमाणे आहे. नंदुरबार तालुक्यात ४१०, शहादा तालुक्यात एक हजार २६, नवापूर तालुक्यात ६७३, तळोदा तालुक्यात ३८९, अक्कलकुवा तालुक्यात ५२३ तर धडगाव तालुक्यात ५४२ शाळा खोल्यांचा समावेश आहे.

कुडाच्या घरात...

सातपुड्यातील अनेक गावांमधील शाळा या कुडाच्या घरात भरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता राहत नाही. शिक्षकांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील अशा गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे ही समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून बांबू शाळेचा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले, परंतु तो देखील यशस्वी होऊ शकला नाही; नंतर फायबर शीटपासून शाळा खोल्या बांधण्याचे ठरविण्यात आले परंतु त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

पडक्या इमारती, गळके छत

अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५० पेक्षा अधिक शाळा खोल्या या गळक्या आहेत. पावसाळ्यात शिक्षकांना प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री लावून गळती थांबवावी लागते. अशावेळी मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळा खोल्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

खापर व परिसरातील सपाटीवरील गावांमधील शाळा खोल्यांची अवस्थादेखील दयनीय आहे. त्याबाबतही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांतच बांधकामासाठी पाऊल उचलावे लागणार आहे. त्यामुळे लवकर निर्णय घेऊन बांधकामास सुरुवात होणे अपेक्षित आहे.