शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

३० कोटींचा निधी शासन समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेला मिळालेला ३० कोटींचा निधी अखर्चित असल्याने तो शासन समर्पित होणार आहे. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेला मिळालेला ३० कोटींचा निधी अखर्चित असल्याने तो शासन समर्पित होणार आहे. परंतु खर्चासाठी मुदत वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा यांनी बैठकीत दिली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, सभापती अभिजीत पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत, जयश्री पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीबाबत विषय चर्चेला आला. यंदा विविध निवडणुकांच्या आचारसंहिता व इतर कारणांमुळे ३० कोटींचा निधी अखर्चीत राहिला आहे. तो शासन समर्पित होणार असल्याची माहिती कॅफो अतुल गायकवाड यांनी दिली. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला असता मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शासनाकडे हा निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
गेल्या सभेत तीन ठराव कुणाच्या संमतीने झाले अशी विचारणा करून त्याला विजय पराडके व अर्चना गावीत यांनी विरोध केला. गेल्या सभेत ९ ते ११ क्रमांकाचे ठराव झाले आहेत. ते कोणाच्या स्वाक्षरीने झाले त्याची माहिती मिळावी, प्रोसेडिंगची प्रत देण्यात यावी अशी मागणी या सदस्यांनी केली.
आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अशा काळात तक्रारी येणे योग्य नाही असे अध्यक्षा सीमा वळवी यांनी सांगितले. भरत गावीत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समितींची पुनर्रचना तातडीने करावी अशी मागणी केली. सी.के.पाडवी यांनी तेलखेडी आरोग्य केंद्रात सात महिन्यापासून डॉक्टर नाही, वडफळीचीही तीच स्थिती आहे. राजबर्डी आरोग्य केंद्र बंद असल्याची बातमी वृत्तपत्रात येते याबाबत काय कारवाई केली याची माहिती त्यांनी मागितली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवतो, राजबर्डीचा अहवाल आला असल्याचे डॉ.बोडके यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीत पाणी टंचाई, कोरोनावर उपाययोजना यासह इतर विषयांवर देखील चर्चा झाली.