शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांना मिळू शकतो प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

नंदुरबार : महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाखांचे कर्ज माफ झाले आहे. ...

नंदुरबार : महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाखांचे कर्ज माफ झाले आहे. यातून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नियमित कर्ज भरणारे २८ हजार ४१७ शेतकरी अद्यापही ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे शेतकरी शासन अनुदान देणार कधी, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ८२ कोटी १० लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून १९२ कोटी रुपयांचे कर्ज एकूण २५ हजार ३६२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यंदाच्या वर्षातही बँकांना साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे; परंतु जिल्ह्यात घोषित झालेल्या प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी झालेली नसल्याने एप्रिल महिन्यापासून कर्ज घ्यावे किंवा नाही, या पेचात शेतकरी अडकले आहेत. यावर शासनाने तातडीने निर्णय देत प्रोत्साहन रक्कम द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करत असून, वारंवार सहकार विभागाकडे चाैकशी करत आहेत. जिल्ह्यात २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अभियानांतर्गत १६ हजार ७६४ शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यात ९ हजार ४१३ हे नियमित कर्ज घेणारे व त्याचा परतावा करणारे शेतकरी असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे शेतकरी प्रोत्साहन योजनेला पात्र आहेत.

२५ हजार शेतकरी कर्जमुक्त

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण २५ हजार २२ शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांचे १८ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. या शेतकऱ्यांना येत्या काळात खरीप कर्ज मिळण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत. शेतकऱ्यांना एनओसी मिळाल्याने त्यांना तातडीने कर्ज मिळू शकेल.

सहकार विभागाकडे योजना

दरम्यान ही योजना सहकार विभागाकडे असल्याने शेतकरी त्याठिकाणी विचारणा करत आहेत. कृषी विभागाकडे प्रोत्साहन योजनेची कोणतीही माहिती नाही. शेतकऱ्यांच्या याद्याही सहकार विभागाने अपडेट केल्या आहेत.

सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रोत्साहन योजनेचा अद्याप जीआरच निघालेला नाही.