२५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:10 IST2020-06-20T04:10:29+5:302020-06-20T04:10:41+5:30

प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्याची सूचना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

2500 MW solar power project to be set up in nandurbar | २५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

२५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

मुंबई : राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्याची सूचना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

एनटीपीसीने हा सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महानिर्मितीने प्रकल्पासाठी आवश्यक असणाºया जागेचा शोध घेऊन याचा सविस्तर अहवाल सादर करावा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, घन कचºयापासून वीजनिर्मिती यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पाकडे सर्वांना गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॉटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती त्यांनी घेतली. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच यातून वीजनिर्मिती सुरू होईल, अशी माहिती महानिर्मितीतर्फे ऊर्जामंत्र्यांना देण्यात आली.

दोंडाईचा येथे जागेचे अधिग्रहण
नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: 2500 MW solar power project to be set up in nandurbar