शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

भिशीच्या पैश्यातून ३७ लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भिशीचे ३७ लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भिशीचे ३७ लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ गेल्या अनेक दिवसांपासून शहरात या प्रकाराची चर्चा सुरु होती़सुभाष छगन चौधरी, प्रमिलाबाई सुभाष चौधरी व बाली चौधरी असे रक्कम घेऊन पसार झालेल्या तिघांची नावे आहेत़ एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०१९ दरम्यान देसाई पुºयातील पुष्पांजली चक्कीसमोर राहणारे सुभाष, प्रमिलाबाई आणि बाली चौधरी या तिघांनी मिळून नंदुरबार शहरात घरसंसार नॉॅव्हेल्टीज या नावाने भिसी सुरु केली होती़ शासकीय नियमानुसार भिशीचे काम करत असल्याचे सांगून त्यांनी अनिरुद्ध रतिलाल मराठे यांच्याकडून १५ लाख, सिमा चंद्रकांत साळवे यांच्याकडून १२ लाख, अर्चना वासुदेव सोनार व योगिता मनोज सटाणकर या दोघींकडून १० लाख रुपये अशी ३७ लाख रुपयांची रक्कम गोळा केली होती़ दरम्यान रक्कम गोळा केल्यानंतर पतीपत्नीसह बाली चौधरी हा नंदुरबार शहरातून अचानक गायब झाले होते़ याप्रकाराची शहरात बºयाच दिवसांपासून चर्चा सुरु होती़ परंतू कोणीही फिर्याद देण्यास पुढे आले नव्हते़ शेवटी फसवणूक झालेले अनिरुद्ध मराठे यांनी शहर पोलीस ठाण्यात भेट देत माहिती दिली होती़ त्यांच्या फिर्यादीवरुन सुभाष व प्रमिलाबाई चौधरी या दाम्पत्यासह बाली चौधरी या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ करत आहेत़गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण शहरात चर्चिले जात होत़े़ फसवणूकीच्या रकमेचा आकडा हा मोठा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम ही २५ लाखांच्या पुढे असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे़ पोलीसांकडून तशी कारवाई येत्या काळात होऊ शकते़ दरम्यान पोलीसांनी तिघांचा शोध सुरु केला असून त्यांचे बँक खाते आणि इतर कागदपत्रांच्या तपासणीकडे लक्ष दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे़