जिल्ह्यात पुन्हा नव्याने वाढले १७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:09 IST2020-07-19T12:08:54+5:302020-07-19T12:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात शनिवारी १७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

17 new patients have been added in the district | जिल्ह्यात पुन्हा नव्याने वाढले १७ रुग्ण

जिल्ह्यात पुन्हा नव्याने वाढले १७ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात शनिवारी १७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५२ वर पोहचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आकडा थेट आता साडेतीनशे पार झाला आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नंदुरबार येथील तेलीवाडी, विमल हौसिंग सोसायटी, लक्ष्मीनगर, जिल्हा रुग्णालय, तांबोळी गल्ली, माळीवाडा येथील प्रत्येकी एक तर भाट गल्लीतील चार, देसाईपुऱ्यातील दोन जणांचा समावेश आहे. शहादा येथील खेतियारोडवरील एक, देवदार गल्ली व पाडळदा, ता.शहादा येथील एकाचा समावेश आहे.
शनिवारी एकुण आठ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहे. त्यात नंदुरबारातील सहारा टाऊन परिसरातील तीन तर ज्ञानदीप सोसायटी, गांधीनगर, जिल्हा रुग्णालय, लहान शहादा, ता.नंदुरबार व शंकर विहार, शहादा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Web Title: 17 new patients have been added in the district