नंदुरबार जिल्ह्यातील 1,316 विद्यार्थी शाळेपासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:51+5:302021-03-24T04:28:51+5:30

नंदुरबार : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणासाठी गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत १,३१६ विद्यार्थी शाळाबाह्य आढळले. यात सर्वाधिक विद्यार्थी हे धडगाव ...

1,316 students away from school in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यातील 1,316 विद्यार्थी शाळेपासून दूरच

नंदुरबार जिल्ह्यातील 1,316 विद्यार्थी शाळेपासून दूरच

नंदुरबार : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणासाठी गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत १,३१६ विद्यार्थी शाळाबाह्य आढळले. यात सर्वाधिक विद्यार्थी हे धडगाव तालुक्यात आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांना आता शाळेत दाखल करण्यासाठी व शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी गेल्या महिन्याभरात विशेष मोहिम राबविण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मणुष्यबळाचीही नियुक्ती करण्यात आली होती. ऐकुण ९६ पथके त्यासाठी नियुक्त करण्यात आली होती. नंदुरबार तालुक्यात सर्वात कमी तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्णांचा त्यात समावेश आहे. सहा ते १४ वयोगटातील बालकांचे याद्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. या बालकांना आता शाळेत दाखल करून घेण्यासाठी मोहिम राबवावी लागणार आहे.

३० मुलं बालकामगार म्हणून कार्यरत...

n सर्वेक्षणात ३० मुलं ही बालकामगार म्हणून कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबार या बालकामगारांमध्ये नंदुरबार तालुक्यात दोन तर तळोदा तालुक्यात २८ जणांचा समावेश आहे. तळोदा तालुक्यात सापडलेले सर्वाधिक बालकामगार हे वीटभट्टी व अन्य कामांवर होते.

n गरजाधिष्ठीत असलेल्या बालकांची संख्येमध्ये नंदुरबार तालुक्यात चार, नवापूर तालुक्यात आठ, शहादा तालुक्यात नऊ, तळोदा तालुक्यात चार, अक्कलकुवा तालुक्यात नऊ तर धडगाव तालुक्यात एका मुलाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण शाळाबाह्य अधीक

n शाळाबाह्य मुलांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात ११ मुले तर सहा मुली, नवापूर तालुक्यात ३५ मुले तर २६ मुली, शहादा तालुक्यात ३८ मुल तर ५० मुली, तळोदा तालुक्यात ३४ मुलं तर ४० मुली. अक्कलकुवा तालुक्यात ६२ मुुुलं तर १०७ मुली आणि धडगाव तालुक्यात ४०९ मुल तर ५०८ मुलींचा समावेश आहे.

n याशिवाय मजुरीसाठी परजिल्ह्यात, परगावी गेलेल्या कुटूंबांच्या मुुलांची संख्या देखील वेगळी आहे. त्यांची नावे शाळेत आहेत, परंतु ते शाळेत जात नाहीत अशी स्थिती आहे.

शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणार...

सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या शाळाबाह्य मुलांना आता शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मोहिम देखील आखावी लागणार आहे. सर्व्हेक्षणात या बालकांचा संपुर्ण पत्ता घेण्यात आल्याने त्यांना आता त्या त्या भागातील शाळेत दाखल करून घेण्यात येणार आहे.

Web Title: 1,316 students away from school in Nandurbar district