शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबीत ११९ अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबाऱ/बामखेडा : बामखेडा येथील कोरोना रुग्णाला जिल्हाबाहेरच कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे नाशिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबाऱ/बामखेडा : बामखेडा येथील कोरोना रुग्णाला जिल्हाबाहेरच कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे नाशिक येथेच त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत देखील त्यांचा समावेश करण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी ११९ अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या १४६ अहवालांपैकी ११९ अहवाल शनिवारी प्राप्त झाले. सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांचा आणि प्रशासनाचाही जीवात जीव आला. धुळे येथील तपासणी प्रयोग शाळेवर जळगाव, मालेगाव व धुळे येथील अहवालांचा मोठा ताण आहे. त्या ठिकाणी अधीक पेशंट सापडत असल्यामुळे तेथील नमुन्यांचे अहवाल लवकर द्यावे लागत असतात. त्यामुळे नंदुरबारचे अहवाल वेटींगवर ठेवण्यात आले होते. ही संख्या तब्बल दीडशेपर्यंत पोहचली होती. त्यामुळे अहवालांकडे सर्वाचे लक्ष लागून होते. त्यातील ९५ अहवला शनिवारी प्राप्त झाले.बामखेडा सतर्ककोरोनाचा एक रुग्ण बामखेडा तर्फे तºहाडी, ता. शहादा येथे आढळला असून खबरदारी म्हणून पूर्ण बामखेडा गाव तसेच ५ किमी परिसर १८ मे पर्यंत पूर्ण प्रतिबंधित (लॉकडाउन) म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, भाजीपाला विक्रेते, मासविक्री केंद्र ,पेट्रोल पंप, सर्व आस्थापने कार्यालय आदी संपूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी व प्रांतधिकारी याच्या वतीने देण्यात आलेले आहे. पीडिताच्या घराच्या आजुबाजूच्या १०० मीटर भाग प्रशासनाने पूर्णपणे सील केला आहे.गावातील किडनी रोगाने त्रस्त रुग्ण धुळे येथील खाजगी रुग्णालयात एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या महिनाभर अगोदर तो २ ते ३ खाजगी डॉक्टरांकड़े इलाज करीत होता. त्या नंतर नाशिक येथे तपासणी केले असता त्या रुग्नाच्या अहवाल हा कोविड १९ पॉजिटिव आला. रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री प्रशासनाकडून तपासली जात आहे. या प्रकारामुळे मात्र पंचक्रोशीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्क राहून प्रशासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. गावात शुकशुकाट असून ग्रामस्थ घरातच बसणे पसंत करीत आहे. सर्वच जण आवश्यक त्या उपाययोजना स्वत:हून करून प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.शुक्रवारी रात्रीच प्रशानातर्फे संपुर्ण गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. काही भाग प्रतिबंधीत करण्यात आला असून काट्याचे कुंपन तसेच बॅरीकेटींग करण्यात आले आहे. संपुर्ण गावात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले. रुग्णाच्या संपर्कातील २७ जण ट्रेस करण्यात आले आहेत. रात्रीच त्यापैकी १३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सहानिरीक्षक चंद्रकांत सरोदे, बीडीओ सी.टी गोस्वामी, आरोग्य अधिकारी डॉ. मोहने, तलाठी नरेश मोरे, पोलिस पाटील डॉ. योगेश चौधरी, सरपंच लीना चौधरी नियंत्रण ठेऊन आहेत.

आज आलेल्या अहवालांमध्ये बहुतेक अहवाल हे आष्टे व नंदुरबार येथे आढळलेल्या कोरोना पेशंटच्या संपर्कातील दुसऱ्या व तिसºया साखळीतील व्यक्तींचे व जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उर्वरित अहवालांमध्ये आता काहींना त्रास जाणवल्याने स्वत:हून आलेले रुग्ण त्व्यक्तींचे अहवाल आहेत.