शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 11 कोटींच्या प्रस्तावीत प्रकल्पांची गुंतवणूक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात 11 कोटी रुपयांच्या प्रस्तावीत प्रकल्पांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात 11 कोटी रुपयांच्या प्रस्तावीत प्रकल्पांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय कार्यबल समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक जयंत देशपांडे, खादी व ग्रामोद्योग आयोग सहाय्यक संचालक पी. एस. वैद्य, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रविंद्र अकोले, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व्यवस्थापक के. जी. जोवळे, नेहरु युवा केंद्र जिल्हा समन्वय अधिकारी अर्ष कौशीक, तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ. स. अ. परदेशी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर आदी अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत जिल्हास्तरीय समितीने एकूण रुपये 11 कोटी चार लाखांच्या प्रस्तावित गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी देऊन संबंधित बँकांकडे शिफारस केली आहे. यामुळे 736 युवकांना रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योग/व्यवसाय करु इच्छिणा:या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाते. निर्मिती क्षेत्रासाठी जास्तीत जास्त 25 लाख व सेवा क्षेत्रासाठी जास्तीत जास्त दहा लाख एवढय़ा गुंतवणूकीचे प्रकल्प पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सामाजिक वर्गवारी व ग्रामीण/शहरी वर्गवारीनुसार कमीत कमी 15 टक्के ते जास्तीत जास्त 35 टक्के अनुदान बँक कर्जाशी निगडीत स्वरुपात देण्यात येते. यामध्ये लाभाथ्र्याचा किमान हिस्सा पाच ते दहा टक्के एवढा आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी    उपलब्ध करुन देणे, बेरोजगार युवकांचे व पारंपारिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. योजनेसाठी जिल्ह्यातील गरजू लोकांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी जास्तीत  जास्त प्रमाणावर अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी    केले. ही योजना संपूर्णपणे   ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात येत आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ नंदुरबार या कार्यालयांशी संपर्क करावा असेही यावेळी सांगण्यात आले.