शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामपंचायती ऑनलाईन, परंतु कारभार कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 10:39 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील सर्वच अर्थात ५९५ ग्रामपंचायती ॲानलाईन झाल्याचा दावा केला जात असला तरी दुर्गम भागातील ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील सर्वच अर्थात ५९५ ग्रामपंचायती ॲानलाईन झाल्याचा दावा केला जात असला तरी दुर्गम भागातील ८० टक्के ग्रामपंचायतीत संगणक संच धुळखात पडले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील ग्रामपंचायती ॲानलाईन असल्या तरी कारभार पेपरलेस होऊ शकला नसल्याची स्थिती आहे.              नंदुरबार जिल्ह्यात एकुण ५९५ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ४५ टक्के ग्रामपंचायती या आदिवासी दुर्गम भागातील आहेत. या भागात कनेक्टिव्हीटीची मोठी अडचण आहे. त्यामुळे ग्रामपंचायती ॲानलाईन असल्याचा दावा असला तरी ते केवळ नावालाच असल्याचे दिसून येते. सपाटीवरील ६५ टक्के ग्रामपंचायती देखील पेपरलेस होऊ शकल्या नसल्याची स्थिती आहे. याला कारण प्रशिक्षीत कर्मचा-यांची कमतरता, दप्तर अद्यावत करण्याबाबत उदासिनता, कनेक्टिव्हीची अडचण हे असल्याचे दिसून येते. असे असले तरी समाधानाची बाब म्हणजे दोन ग्रामपंचायतींनी आयएसओ मानांकन मिळविले आहे. आयएसओ मिळवूनही या ग्रामपंचायती पेपरलेस होऊ शकल्या नाहीत. 

तालुका निहाय  ग्रामपंचायती                                                                                                                                                                      नंदुरबार   -१३७    शहादा    - १५०तळोदा    -६७नवापूर  -  ११४अ.कुवा  -७७धडगाव- ५०एकुण   - ५९५

जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायती  ५९५पेपरलेस ग्रामपंचायती ००

काही ऑनलाईन सेवा मालमत्ता कर, रहिवासी, वीज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, शौचालय दाखला, विवाह नोंदणी दाखला, हयातीचा दाखला, वयाचा दाखला असे विविध दाखले ऑनलाईन दिले जातात.

 अडचणी काय?*दुर्गम भाग असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हीटीची मोठी अडचण.* ग्रामपंचायतमध्ये प्रशिक्षीत कर्मचारी नाहीत. प्रशिक्षीत कर्मचारी भरले तरी त्यांना तेवढा पगार देण्याची ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती नाही. *अत्यावश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून घेण्यासाठी ग्रामपंचायतींना आर्थिक तरतूद नाही.ग्रामपंचायतींचीही मानसिकता नाही.

        जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु आवश्यक सुविधा, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी यांचा अभाव त्याला अडथळा ठरत आहे. याशिवाय जिल्ह्यातील ९८ टक्के ग्रामपंचायतींचा कारभार हा अनुदान आणि योजनांच्या निधीवरच चालतो. वेगळे उत्पन्न नसल्यामुळे आधुनिकतेसाठी होणाऱ्या खर्चालाही मर्यादा येतात.