शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

डॉ. शिंदे म्हणाले की, जादुटोना प्रतिबंध कायद्याचा मुख्य उद्देश हा शोषणमुक्त समाज निर्माण करणे हा आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ...

डॉ. शिंदे म्हणाले की, जादुटोना प्रतिबंध कायद्याचा मुख्य उद्देश हा शोषणमुक्त समाज निर्माण करणे हा आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शतकोनशतके अंधश्रद्धेचा पगडा समाजावर राहिलेला आहे. अंधश्रद्धेमुळे गरीब जनतेची पिळवणूक होते. ते आणखीनच दारिद्र्यात लोटले जातात. याबाबत शासन दरबारी २० वर्षे प्रयत्न करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नातून हा कायदा पारित झाला. या कायद्याच्या व त्यातील वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर प्रतिबंध घातला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. स्वत:चे पोट भरण्यासाठी, स्वार्थासाठी वेगवेगळे चमत्कार करून दाखवतात, तेसुद्धा या कायद्यान्वये दोषी ठरतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

डॉ. मनीषा मांजरमकर यांनी जादुटोना प्रतिबंध कायद्यात समाजकार्यकर्त्याची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना समाजकार्य पद्धतीचे ज्ञान असल्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्षरित्या करू शकतात. पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, भित्तीपत्रके, स्लोगनस्‌ इत्यादींच्या माध्यमांतून जादुटोना प्रतिबंध कायद्याची जनजागृती प्रभावीपणे करू शकतात, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डब्ल्यू. आर. मुजावर यांनी जादुटोना प्रतिबंध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे व हा कायदा समाजाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक प्रा. आर. सी. दोरवे यांनी केले. प्रा. दिलीप काठोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विद्याधर रेड्डी यांनी आभार मानले.